Agriculture Irrigation : ‘पुरंदर’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

Purandar Irrigation Scheme : मागील पंधरा दिवसांपासून बंद असणारे पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी माळशिरस वितरिकेवरील शेवटी असणाऱ्या गावांपर्यंत अद्याप मिळाले नाही.
Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Agrowon
Published on
Updated on

Pune News : मागील पंधरा दिवसांपासून बंद असणारे पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी माळशिरस वितरिकेवरील शेवटी असणाऱ्या गावांपर्यंत अद्याप मिळाले नाही. यामुळे डोळ्यांदेखत पाण्याअभावी पिके जळू लागल्याने किती दिवस योजनेच्या पाण्यासाठी आम्ही फक्त प्रतीक्षाच करायची? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे पाणी न आल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी माळशिरस वित्तरिकेवरील शेवटच्या भागातील लाभार्थी शेतकऱ्यांना सोडावे, अशी मागणी करीत आहेत. माळशिरस वितरिकेचा टेकवडी नजीक मुख्यलाईनमध्ये बिघाड झाला. यामुळे १५ डिसेंबरला माळशिरस वितरिका बंद केली होती. शेतकऱ्यांच्या तीव्र मागणीमुळे दोनच दिवसात काम पूर्ण करून पाणी परत सुरू करू असे त्यावेळेस सांगितले होते.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शेतकऱ्यांनी स्वखर्चाने साकारली उपसा योजना

मात्र प्रत्यक्षात जलवाहिनीची दुरुस्ती केली नाही. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर तरी त्वरित पाणी सुरू होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात ही वितरिका सुरू न करता राजेवाडी वितरिकेतून बारामती तालुक्यामध्ये पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर परत २२ डिसेंबरपासून पाणी सुरू केले जाईल, असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही बारामती तालुक्यासाठी राजेवाडी वितरिकेतून पाणीपुरवठा सुरू केल्याने माळशिरस वितरिकेवरील शेतकऱ्यांना पाण्याकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : साताऱ्यातील ३,५०० शेतकऱ्यांची ठिंबक अनुदानासाठी प्रतीक्षा सुरू

चार दिवस बारामती तालुक्यासाठी पाणी चालल्यानंतर २७ डिसेंबरपासून माळशिरस वितरीकेस पाणीपुरवठा सुरू करू, असे आश्वासन योजनेची शाखा अभियंता नीलेश लगडे यांनी दिले होते. मात्र परत कालपासून पाणी येण्याऐवजी पंपच बंद ठेवल्याने आजपर्यंत माळशिरस वितरिकेवरील शेवटच्या भागातील शेतकऱ्यांकडे योजनेचे पाण्याने पाठच फिरवलेली दिसत आहे.

कांद्यासारखी पिके पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करत आहे. अधिकारी फक्त वारंवार तारीखच देत असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलनच करावी लागेल की काय? असे संतप्त शेतकरी बोलू लागले आहेत.

दुरुस्तीच्या कामानंतर माळशिरस वितरिकेवरून शेवटच्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देऊ.
अशोक शेटे, पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन कार्यकारी अभियंता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com