Trichoderma Fungi Agrowon
ॲग्रो विशेष

Trichoderma Fungi : रोग नियंत्रणासाठी पर्यावरणपूरक ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर

Trichoderma Use : बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक मरतात. कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला आणि ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. या रोगांसाठी अनेक प्रकारच्या बुरशी कारणीभूत असतात.

Team Agrowon

Crop Disease Control : बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक मरतात. कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला आणि ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. या रोगांसाठी अनेक प्रकारच्या बुरशी कारणीभूत असतात. पिकावर या बुरशीचा प्रादुर्भाव मातीतून किंवा बियाण्यामार्फत होत असतो. या बुरशीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जातो.

पण पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो. या पर्यावरणपुरक बुरशीमध्ये ट्रायकोडर्मा बुरशी ही अत्यंत उपयुक्त आहे. ही बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशीची वाढ होऊ देत नाही. त्यामुळेच पेरणीपुर्वी बियाण्यावर जैविक बुरशीनाशकांची बिजप्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते.

निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील काही पिकांवर रोगकारक असतात, तर काही बुरशी पिकांचं रोगांपासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही हिरव्या रंगाची जवळ जवळ सर्व प्रकारच्या जमिनीत अढळणारी उपयुक्त बुरशी आहे. ट्रायकोडर्मा सेंद्रिय पदार्थांच्या सानीध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी असून, परोपजीवी तसचं इतर रोगकारक बुरशींवर वाढते. ट्रायकोडर्मा बुरशी विशेष करुन मातीतून उद्भवणाऱ्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी एक प्रभावी जैविक पद्धत आहे. .

आता पाहुया ट्रायकोडर्माची नेमकी कशी काम करते ते...

ट्रायकोडर्मा चा वापर बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी तसचं पिकांवर फवारणीद्वारे करता येतो. सेंद्रिय खते तयार करण्यासाठीही ट्रायकोडर्माचा उपयोग होतो.

ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून, त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. त्यामुळे रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यांची वाढ खुंटते. ही बुरशी प्रतीजैविक तयार करते. ही प्रतीजैविके रोगकारक बुरशीला मारतात. तसचं ट्रायकोडर्मा बुरशी ही मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठीही उपयोगी आहे.

ट्रायकोडर्माचा अजून चांगला परिणाम होण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशींनाशकांसोबत करू नये. तसचं ट्रायकोडर्माची साठवणूक करताना ती उन येईल अशा ठिकाणी न ठेवता कोरड्या आणि थंड जागेत साठवावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT