Salam Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Testing : माती परिक्षण कसे करावे?

Soil Health : सामान्यतः आपल्या शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षांतून एकदा परीक्षण करायला हवे. मात्र वर्षानुवर्षे शेतात तेच पीक घेत असल्यास दरवर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते.

Team Agrowon

Soil Test : सामान्यतः आपल्या शेतातील मातीचे किमान तीन ते चार वर्षांतून एकदा परीक्षण करायला हवे. मात्र वर्षानुवर्षे शेतात तेच पीक घेत असल्यास दरवर्षी माती परीक्षण नाही केले तरी चालते. शेतातील खरीप पिकाची काढणी केल्यानंतर लगेचच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत. पिकाला रासायनिक किंवा सेंद्रिय खत दिल्यानंतर तीन महिन्यानंतरच मातीचा नमुना घ्यावा. प्रातिनिधिक नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावे लागतात. नमुने घेण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे, पिशवी या वस्तू सोबत ठेवाव्यात.

मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो; परंतु वर्षातून दोन किंवा तीन पिकांची लागवड करत असल्यास दरवर्षी मातीचा नमुना घेण्याची गरज असते.

एप्रिल -मे महिन्यात मातीचा नमुना घ्यावा. पिकाला सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये.

मातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र, विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके आणि जलसिंचन यांचा विचार करून नमुना घ्यावा.

नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत. उदा. चोपण जमीन, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उतारावरची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत.

निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा.ः फावडे, कुदळ, घमेले, खुरपे स्वच्छ असावे.

माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापर करू नये.

शेतामधील खते साठविण्याची जागा, काडीकचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळील जागा, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.

मातीचा नमुना प्रातिनिधिक असावा. वरीलप्रमाणे भाग पाडलेल्या शेताच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी- रुंदीप्रमाणे कमी जास्त अंतरावर असाव्यात. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा केलेल्या जमिनीवरील पालापाचोळा, तण काढावे. त्या ठिकाणी २२.५ सें.मी.(वीतभर) खोल खड्डा घ्यावा. खड्ड्यातील सर्व माती हाताने अगर खुरप्याने काढून टाकावी. खड्ड्याचा आकार साधारणपणे ‘व्ही` अक्षराप्रमाणे असावा. खड्ड्याच्या एका बाजूची साधारणपणे चार सें.मी. जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी. ही माती स्वच्छ घमेल्यात घ्यावी.

अशा प्रकारे एका हेक्‍टरमधून १० ते १२ ठिकाणची गोळा केलेली माती पॉलिथीन तुकड्यावर पसरावी. मातीतील खडे, वनस्पतीची मुळे काढून टाकावीत. त्यानंतर त्याचे चार समान भाग करावेत. त्यानंतर समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी दोन ओंजळीएवढी किंवा अर्धाकिलो माती शिल्लक राहेपर्यंत ही क्रिया करावी.

मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा.

विविध पिकांकरिता नमुन्याची खोली ः १) हंगामी पिके ः २० ते २५ सें.मी. २) बागायती पिके ः ३० ते ४० सें.मी. ३) फळबाग पिके ः ६० सें.मी.

(An initiative by Salam Kisan.)

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT