Team Agrowon
अनेक शेतकरी शेताच्या चार कोपऱ्यांवर चार आणि एक शेताच्या मधोमध खड्डा खोदून त्यातून मातीचा नमुना घेतात. हा प्रकार पूर्णतः चुकीचा आहे.
शेतात एखाद्या ठिकाणी दोन ते तीन फूट खोल खड्डा खोदून त्यामधील माती परीक्षणासाठी काढू नये.
खड्डा खोदताना त्या खड्ड्यातून निघणारी सर्व माती परीक्षणासाठी घेऊ नये.
खोदलेल्या खड्ड्यातील अगदी खालची म्हणजे तळातील माती परीक्षणासाठी घेऊ नये.
शेतातील कोणतीही माती ओंजळीने भरून ती परीक्षणासाठी पाठवू नये.
खोदलेल्या खड्ड्यातील अगदी खालची म्हणजे तळातील माती परीक्षणासाठी घेण.
कोणत्याही उद्देशासाठी माती परिक्षणासाठी सारख्याच पद्धतीनं नमुना घेऊ नये.