Automated Farm Machinery  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme: सरकारकडून 'स्वयंचलित कृषी यंत्र' खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Automated Farm Machinery Subsidy: कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ‘स्वयंचलित कृषी यंत्र’ खरेदीसाठी यंत्राच्या किमतीच्या ४० टक्के ते ५० टक्के इतके अनुदान मिळणार आहे.

Roshan Talape

Pune News: शेतीतील मजूर टंचाई आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून “कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना” राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ‘स्वयंचलित कृषी यंत्र’ खरेदीसाठी यंत्राच्या किमतीच्या ४० टक्के ते ५० टक्के इतके अनुदान मिळणार आहे.

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना ५० टक्के तर इतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामुळे मजूर टंचाई, वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

योजनेचा उद्देश

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री सहज उपलब्ध करून देऊन उत्पादनक्षमता वाढवणे, मजुरीवरील खर्च कमी करणे आणि शेतीत नफा वाढवणे हा आहे

शेतकऱ्यांसाठी फायदे

  • स्वयंचलित यंत्रांच्या वापरामुळे कमी वेळेत जास्त क्षेत्रावर शेती करता येते.

  • मजूर टंचाई असतानाही काम वेळेत पूर्ण होते, मजुरीचा खर्च वाचतो.

  • यंत्रसामग्रीने पेरणी, लागवड, कापणी इत्यादी टप्पे जलद पूर्ण होतात.

  • यंत्रांच्या मदतीने अचूक व एकसारखे काम होऊन पीकाची गुणवत्ता वाढते.

  • उत्पादन खर्च कमी व उत्पादन जास्त झाल्यामुळे उत्पन्न वाढते.

पात्रतेच्या मुख्य अटी

  • अर्जदार शेतकरी असावा.

  • शेतीचे जमीन मालकी हक्क किंवा भाडेपट्टीवर असावी.

  • शासनाने निश्चित केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक.

  • पूर्वी याच योजनेतून अनुदान घेतलेले नसावे.

  • एका वेळी फक्त एका यंत्रासाठीच अनुदान मिळेल.

  • पूर्वी त्या यंत्रासाठी अनुदान घेतले असल्यास, १० वर्षांपर्यंत त्याच यंत्रासाठी अर्ज करता येणार नाही.

  • मात्र, इतर नवीन यंत्रांसाठी अर्ज करता येईल.

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य ही पद्धत लागु केली.

लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • ७/१२ उतारा, ८ अ दाखला

  • शेतकरी ओळखपत्र

  • आधार लिंक असलेले बँक खाते

  • यंत्राचे कोटेशन

  • पूर्वसंमती पत्र व स्वयंघोषणापत्र

अर्जाची लिंक

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर घेता येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT