Rural Development : एका गावात श्रीधर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. श्रीधरकडे फक्त दीड एकर जमीन होती. दुष्काळाच्या काळात गावातील अनेक शेतकरी पाझर तलावाच्या कामाला रोजंदारीवर जाऊ लागले होते.
दुष्काळात गावातून पाझर तलावाच्या कामाला जाताना गावातील लोकांना एकमेव पायवाट होती ती श्रीधरच्या शेतातून! निसर्गाची कृपा झाली. जून महिन्यात पावसाळ्याला सुरवात झाली. त्या गावात व परिसरात धो-धो पाऊस पडायला लागला.
गावातील सगळे लोक शेतीच्या मशागतीला लागले होते. श्रीधरने सुद्धा आपली जमीन नांगरायला सुरवात केली. श्रीधर जमीन नांगरायला लागल्यावर गावातील काही लोक श्रीधरकडे आले व त्याला म्हणाले, ‘‘पाझर तलावाच्या कामाला जायला हा एकमेव रस्ता आहे, आणि तू जर इथे पीक घेतले तर गावातल्या इतर लोकांना पाझर तलावाच्या कामाला जायला दुसरा रस्ता नाही.
एकदा वाट पडली की, कायद्याने आपोआप आमची वहिवाट सुरू झाली. आता आमच्यासाठी हा कायमचा सार्वजनिक रस्ता झाला आहे.’’
श्रीधर गरीब शेतकरी असल्यामुळे तो गावातील लोकांना गयावया करू लागला, ‘‘माझी दीड एकर जमीन आहे. माझे गरिबाचे नुकसान तुम्ही लोक नका करू.’’ पण गावातील लोक श्रीधरचे एकही म्हणणे ऐकून घ्यायला तयार नव्हते.
श्रीधर गरीब असल्यामुळे गावातील लोक त्याला दमदाटी करू लागले. सांगायचे तात्पर्य म्हणजे मालकीच्या पाठोपाठ ताबा आला पाहिजे हे कायद्याचे सर्वसामान्य तत्त्व व्यवहारात अनेकदा उलट होताना दिसते. वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यास हा वहिवाटीचा प्रश्न टाळता येणे शक्य होऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.