Horticulture Conference Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Conference : आंबा उत्पादक संघातर्फे फलोत्पादन मूल्यवर्धन परिषद

Climate Change Issue : हवामान बदल आणि तापमान वाढीचा फटका शेती क्षेत्राला बसत आहे. यामध्ये फलोत्पादन क्षेत्राला अधिकचा फटका बसत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

Team Agrowon

Pune News : हवामान बदल आणि तापमान वाढीचा फटका शेती क्षेत्राला बसत आहे. यामध्ये फलोत्पादन क्षेत्राला अधिकचा फटका बसत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हवामान बदलाच्या विविध समस्यांवर विचारविनिमयाने मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र आंबा उत्पादक संघाच्या वतीने फलोत्‍पादन मूल्यवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता. १८) मुंबई येथे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई), बीकेसी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिंचन, पणन, सप्लाय चेन, प्रक्रिया, ब्रँडिंग आदी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या बरोबरच प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात बँक, विमा, खासगी वित्तीय संस्था, फळे भाजीपाला सुकविण्यासाठी ड्रायर,सौर यंत्रणा, मधमाशी पालन, आदींचे स्टॉल असणार आहेत.

या परिषदेस एनएसईचे मुख्य अर्थतज्ज्ञ तिर्थंकार पटनाईक, इसीजीसीचे कार्यकारी संचालक सुबिर दास, सहसंचालक कृषी अंकुश माने, एनएसआयसी भारत सरकारचे झोनल मॅनेजर मनोजकुमार सिंह तसेच राज्य शासनाचे संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तज्ज्ञ तसेच केंद्र शासनाच्या नाबार्ड, सिडबी या उपक्रमांचे परिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या परिषदेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले आहे. परिषदेस सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही तरी प्रवेश निश्चितीसाठी ९९२०१८४६६६/९५९४८८४६६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मोकल यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT