Natural Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming : उत्कृष्ट नैसर्गिक शेती करणाऱ्या महिलांचा सन्मान

Team Agrowon

Washim News : गाव पातळीवर कृषी व पशु सखींची चळवळ, ग्रामीण महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे. शेतीचे तंत्र प्रामुख्याने नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी खर्चावरील बचत करावी व यासाठी या वर्षापासून उत्तम नैसर्गिक शेती करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असे सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त अॅड. नकुल देशमुख यांनी जाहीर केले.

स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने नैसर्गिक शेतीला अनुसरून मूल्यवर्धित नैसर्गिक अन्न प्रक्रिया उत्पादने महत्त्व, संधी, पॅकेजिंग, लेबलिंग व विक्री व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळा व चर्चासत्र शुक्रवारी (ता. १६) कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर घेण्यात आले.

अध्यक्षस्थानी अॅड. नकुल देशमुख तर उद्‍घाटक म्हणून उमेद प्रकल्पाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे तसेच जयश्री देशमुख, अमृता देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, जिल्हा व्यवस्थापक दीपक चव्हाण व तालुका व्यवस्थापक राजकुमार खानझोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात डॉ. काळे यांनी कार्यशाळेचा उद्देश मांडला. अध्यक्षीय भाषणात अॅड. देशमुख यांनी गाव पातळीवर कृषी व पशु सखींची चळवळ ग्रामीण महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरत असल्याचे सांगितले. जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांनी उमेद प्रकल्पातील सर्व सखी जिल्हाभर करीत असलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल विश्वास व्यक्त केला.

गाजर गवत व्यवस्थापन व कंम्पोस्ट निर्मितीबाबत शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख तर जैविक सामूहिक नियंत्रण या विषयावर शास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शास्त्रज्ञ एन. बी. पाटील यांनी नैसर्गिक शेती पद्धती व गोकृपा अमृतचा वापर तर शुभांगी वाटाणे यांनी मूल्यवर्धित नैसर्गिक अन्न प्रक्रिया उत्पादने, महत्त्व, संधी, पॅकेजिंग, लेबलिंग व विक्री व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले.

तांत्रिक सत्रानंतर कृषी सखींनी नैसर्गिक शेती ब्लॉक मधील बीजामृत, जिवामृत, घनजिवामृत, गांडुळखत, नॅडेप, दशपर्णी अर्क इत्यादी जैविक निविष्ठा पद्धती करण्याचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यानी दिले. सूत्रसंचालन शुभांगी वाटाणे यांनी केले. आभार डॉ. एस. के. देशमुख यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : पशुगणनेला तांत्रिक अडचण; अॅप रिफ्रेशची डोकेदुखी

Waiting For Rain : पुरंदरला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Rain Update : कोकण, विदर्भात पावसाच्या मध्यम सरी

Village Development : आदिवासी गावांचा कायापालट होणार

Agriculture E-KYC : ‘केवायसी’ अभावी १९ लाख शेतकऱ्यांची मदतवाटप थांबली

SCROLL FOR NEXT