Honey Bee Agrowon
ॲग्रो विशेष

Honey Village : प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘मधाचे गाव’

Honey Production : सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन तर विदर्भातील एका गावात हे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यांत हे काम होईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘मधमाश्‍यांचे संवर्धन त्यासोबतच मध उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन तर विदर्भातील एका गावात हे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यांत हे काम होईल,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या श्री. साठे यांनी ‘ॲग्रोवन’सोबत विशेष संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘अन्नसाखळीत मधमाश्‍या हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार मांगर (महाबळेश्‍वर) राज्यातील पहिले मधाचे गाव विकसित करण्यात आले.

त्यानंतर पाटगाव (कोल्हापूर), आमझरी (अमरावती) ही दोन गावे मधाचे गाव म्हणून विकसित होत आहेत. त्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात असे गाव उभारण्याचे नियोजन आहे. त्याला गती देत भीमाशंकर (पुणे), बदलापूर (ठाणे)सह दहा जिल्ह्यांत दुसऱ्या टप्प्यात याविषयीची कामे होतील.’’

‘‘‘मधाचे गाव’ होण्यासाठी त्या गावाला पुरस्कार मिळालेला हवा, तसेच ग्रामसभेचा ठराव पाहिजे, असे काहीसे निकष आहेत. याअंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी खर्च केला जातो. मधमाशांविषयी जागृतीसाठी प्रदर्शनी, सेल्फी पॉइंट राहतात.

मधमाश्‍यांविषयी जागृती व्हावी याकरिता जिल्हास्तरावर मेळावे होतात. राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीचे गठण त्यासाठी करण्यात आले आहे. हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राहतात. मंडळाद्वारे उद्योजकांकडून उत्पादित मधाची हमीभावाने खरेदी होते. त्यापूर्वी मधाची शुद्धता तपासतो. त्यानंतरच त्यावर प्रक्रिया करतो,’’ असेही साठे म्हणाले.

‘‘राज्यात मधक्रांती होण्यासाठी विविध उपक्रम राबवविण्याचे नियोजन आहे. पुण्यात राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करू. मधुमित्र पुरस्कार आम्ही सुरू केले. जागतिक मधमाश्‍या दिनाला महाबळेश्‍वरला कार्यक्रम घेतला.

‘हनी फेस्टिवल’ घेण्याचे नियोजन आहे. ‘हनी कॅफे’ अशी संकल्पना प्रस्तावीत आहे. चहा -कॉफीमध्ये साखरेऐवजी मध टाकला जाईल. दिवाळी किंवा इतर उत्सवात मधाची बाटली भेट द्या, या उपक्रमाला प्रोत्साहन दिले जाईल. ग्राहकांना मध खरेदीसाठी ऑनलाइन खरेदीचा पर्याय असावा, याकरिता ॲप तयार केले जाईल,’’ असे साठे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT