Sweet Potato Agrowon
ॲग्रो विशेष

Sweet Potato : बाजारात रताळी ४० रुपये किलो

Ashadhi Ekadashi : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये एकादशी दिवशी फराळात वापरल्या जाणाऱ्या कंदांची आवक झाली आहे.

Team Agrowon

Solapur News : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये एकादशी दिवशी फराळात वापरल्या जाणाऱ्या कंदांची आवक झाली आहे. रताळे, बटाट्यांसोबत केळीही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून रताळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रविवारी होणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या उपवासादरम्यान फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची बाजारात आवक सुरू झाली आहे.

घाऊक बाजारात अडीच हजार रुपये ते तीन रुपये प्रति क्विंटल दराने रताळ्यांची विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात रताळे ४० रुपये ते ५० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. रताळ्या सोबत बटाटा, केळी यांचीही बाजारात मागणी होत आहे.

बाजार समितीत १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल विकणारा बटाटा किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. केळीचेही दर प्रति डझन ४० रुपये ते ५० रुपये इतके आहेत. उपवासासाठी वापरला जाणारा साबुदाणा प्रतिकिलो ५५ रुपये ते ६० रुपये दराने उपलब्ध आहे.

सध्या बाजारात परराज्यातून रताळ्याची आवक सुरू आहे. बेंगलोर, हसन, बेळगाव व हुबळी परिसरातील शेतकरी रताळे विक्रीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठवत आहेत. आषाढी वारीच्या तोंडावर रताळ्याला चांगली मागणी आहे.
- शिवानंद भडंगे, व्यापारी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Animal Attack: एप्रिलमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू, पीक नुकसानीची १,६६१ प्रकरणे, वनमंत्र्यांची माहिती

Heavy Rainfall: सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडलात अतिवृष्टी; ‘खडकी’ला पूर

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूकांडावरून गदारोळ

Village Development Plan: ग्राम विकास आराखडा, पाण्याचा ताळेबंद आणि जिल्हा नियोजन समिती

Brahmangaon Village Success Story: उपक्रमशीलतेत कायमच अग्रेसर ब्राह्मणगाव

SCROLL FOR NEXT