Ashadhi Ekadashi : पंढरीत स्वच्छतेासाठी १५०० हून अधिक कर्मचारी तैनात

Pandharpur Yatra Planning : भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025Agrowon
Published on
Updated on

Pandharpur News : आषाढी यात्रेसाठी परराज्यासह राज्यभरातून आलेल्या लाखो वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षिततेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.

यासाठी १५४२ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये नगरपरिषदकडून ३४८ कायम कर्मचारी तर जवळपास १००० हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत १९४ कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025: माळीनगरात रंगले उभे रिंगण

आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट, ६५ एकर परिसर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास प्रशासनामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तसेच नदी पात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर व इतर विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.

Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025: खुडूस फाटा येथे गोल रिंगणावेळी माऊली-माऊली नामजपाचा गजर

तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरिन टेस्ट केली जाणार आहे. शहरासह ६५ एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या, कॉम्पॅक्ट, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी, जेंटिंग आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील. दररोज ५५ ते १२० टन इतका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वारकऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष

यात्रेकरुंच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट, ६५ एकर परिसर, रेल्वे मैदान या ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी पाण्याच्या टीपा ठेऊन त्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com