Rajashri Shahu Maharasj Historic Document Agrowon
ॲग्रो विशेष

Rajarshi Shahu Maharaj Donation : राजर्षि शाहू महाराजांच्या देणगीच्या ऐतिहासिक आज्ञापत्राचे अनावरण

Udaji Maratha Hostel : मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून १०५ वर्षांच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा मिळेल, असे प्रतिपादन ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहातून आपले शिक्षण पूर्ण करून करियर घडविले, त्या उदाजी मराठा वसतिगृहाच्या भूमिपूजनाप्रसंगी राजर्षि शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीच्या आज्ञापात्राची मूळ प्रत आता उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात कायमस्वरूपी बघायला मिळणार आहे.

मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून १०५ वर्षांच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा मिळेल, असे प्रतिपादन ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय व उदोजी अर्ली हेरिटेज स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने उदाजी महाराज वारसा संग्रहालयात उदाजी मराठा वसतिगृहाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वास मोरे, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, सेवक सदस्य डॉ. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, डॉ. विलास देशमुख, डॉ. कैलास शिंदे, डॉ. अजित मोरे, प्रा. शशिकांत मोगल, प्राचार्य प्रशांत पाटील, होरायझन ॲकॅडमीच्या मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा, ज्योती सामंता, नेहा सोनवणे, दीप्ती पटेल उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीच्या आज्ञापत्राच्या मूळ प्रतीचे अनावरण करण्यात आले.

राजर्षि शाहू महाराजांकडून १५ हजार रुपयांची देणगी

शिक्षणाधिकारी प्रा. मोगल यांनी सांगितले, १९१४ मध्ये स्थापन झालेल्या ‘मविप्र’ संस्थेच्या स्वमालकीच्या पहिल्या वास्तूचे भूमिपूजन राजर्षि शाहू महाराजांच्या हस्ते १५ एप्रिल १९२० रोजी झाले. त्या वेळी राजर्षि शाहू महाराजांनी १५ हजार रुपये देणगी दिली होती.

यासंदर्भात ठराव (आज्ञापत्र) करण्यात आला होता. त्याची मूळ प्रत ‘मविप्र’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे नुकतीच कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाकडून प्राप्त केली आहे. हा ऐतिहासिक अमूल्य ठेवा जतन व्हावा, या हेतूने या ठरावाच्या मूळ प्रतीचे वसतिगृहाच्या स्थापनादिनी अनावरण करण्यात आले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT