Hirda Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Agitation : हिरडाप्रश्‍नी उपोषण स्थगित, आंदोलन सुरू

Hirda Issue ; सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन २५ फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होईल,

Team Agrowon

Pune News : हिरड्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून मंचर येथील उपविभागीय कार्यालय येथे किसान सभेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू होते. या उपोषणस्थळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन २५ फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होईल,

असे आश्‍वासित करून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्यास किसान सभेने प्रतिसाद देत उपोषण बुधवारी (ता. २१) स्थगित केले. पण आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार किसान सभेने घेतला आहे.

निसर्ग चक्रीवादळात जून २०२० साली जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही नुकसानभरपाई मिळावी म्हणून किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील साडेतीन वर्षे आंदोलन व या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत गावपातळीवर विविध आंदोलने सुरू केली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांनी घोडेगाव ते मंचर असे १५ किमी पायी चालत या आंदोलनाला पाठिंबा दिला.

या सर्व आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी हिरडा नुकसानभरपाई देऊ, अशी घोषणा केली होती.

तसेच उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावे, असे आवाहनही केले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही उपोषणकर्त्यांशी फोनवर संवाद साधून उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले होते.

यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांच्या माध्यमातून मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. या वेळी अनिल पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले व हा प्रश्न या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्की मार्गी लागेल, असे आश्वासित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT