Guava Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Guava Auction : हिमायत बागेतील अतिक्रमण काढल्याच्या परिणामी केंद्राच्या महसुलात वाढ

Guava Market : हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून त्यात लागवड केलेल्या पेरू बागेतील फळांचा नुकताच (ता. १० रोजी) लिलाव केला गेला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chh. Sambhajinagar News : हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून त्यात लागवड केलेल्या पेरू बागेतील फळांचा नुकताच (ता. १० रोजी) लिलाव केला गेला. त्यामुळे आजवर हजारोंत जाणारा हा लिलाव यंदा पहिल्यांदाच दीड लाखाच्या पुढे गेला.

यासंदर्भात माहिती देताना हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील म्हणाले, की हिमायतबाग फळ संशोधन केंद्राच्या सर्वे क्रमांक २२ मधील ७ एकर ५ आर जमिनीवर केंद्राच्या स्थापनेपासून अतिक्रमण करण्यात आले होते. आपण हिमायतबाग केंद्राचा प्रभारी अधिकारीपदाचा पदभार घेतल्यानंतर भूमी अभिलेख विभागामार्फत तातडीची मोजणी करून सर्वे नंबरची जमीन पोलीस संरक्षणात ताब्यात घेत हद्द निश्चिती करून सिमेंट पोल लावले. या अतिक्रमित जागेवर अतिक्रमणधारक विविध पिके घ्यायचे.

या जागेतील पेरू झाडे व बागेतील पेरू झाडांचा लिलाव एकत्र केल्याने महसूलवाढीचा फायदा केंद्रास होऊन महसूल प्राप्त झाला. यानंतर बाकी क्षेत्रावर सीताफळ लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या लिलाव प्रक्रियेत ९ व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या लिलावासाठी डॉ. रवींद्र नैनवाड, डॉ. विजय सावंत, डॉ. गिरीश सोनवणे, डॉ. सदाशिव अडकिने, राजू सोनवणे, महंमद इसाक, शाहेबाझ, अनिल बखळे आदींची उपस्थिती होती.

अतिक्रमित जागेतील सुमारे १९५ झाडांसह एकूण ५७९ पेरू झाडांचा या वेळी लिलाव करण्यात आला. मागील वर्षी लिलावातून ६० हजार रुपयेच रक्कम मिळाली होती. यंदा मात्र पेरू बागेचा लिलाव १ लाख ५९ हजार रुपयांना गेला. अतिक्रमण हटविण्यासाठी महसूल विभागासह पोलीस विभागाचे मोठे सहकार्य मिळाल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

पोलीस आणि महसूल विभागाच्या सहकार्यामुळे हिमायत बाग फळ संशोधन केंद्राच्या जागेवरील अतिक्रमण हटविता आले. त्यामुळे पेरू बागेच्या झाडांची संख्या वाढवून फळ संशोधन केंद्राचा महसूलही वाढला.
- डॉ. संजय पाटील, प्रभारी अधिकारी, हिमायतबाग फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Farmer Protest: ७/१२ कोरा करण्याच्या मागणीसाठी नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प; शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र

Urea Shortage : सांगलीत युरियाची टंचाई

Crop Competition : खरीप पीक स्पर्धेत सहभागी व्हा; कृषी विभागाचे आवाहन

Eco Tourism : सातपुड्यात हिरवळ; पाल ‘इको टुरिझम’ला पसंती

SCROLL FOR NEXT