Gokul Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Cow Milk Rate : गोकुळकडूनच गाय खरेदी दर सर्वाधिक; शौमिका महाडिकांनी दिशाभूल थांबवावी, अध्यक्षांचा पलटवार

Arun Dongale : राज्यात गोकुळचा गाय दूध खरेदी दर सर्वाधिक आहे. गोकुळकडून इतरांपेक्षा जास्त सेवा सुविधा दिल्या जातात. काही महिन्यांपासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Gokul Milk Rate : कोल्हापूर जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना यापूर्वी प्रतिलिटर ३५ रुपये दर दिला जात होता. आताही अमूलसह इतर संघ आणि खासगी कंपन्यांच्या तुलनेत गोकुळच राज्यातील सर्वाधिक दूध दर देत आहे. त्यामुळे शौमिका महाडिक यांनी उत्पादकांची दिशाभूल करणे बंद करावे, असा पलटवार 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

डोंगळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात गोकुळचा गाय दूध खरेदी दर सर्वाधिक आहे. गोकुळकडून इतरांपेक्षा जास्त सेवा सुविधा दिल्या जातात. काही महिन्यांपासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे.

कोरोनानंतर गाय आणि म्हैस दुधाला चांगली मागणी असल्याने दुधाला चांगला खरेदी दर देता आला. बटर व दूध पावडरीचे दरही वाढले होते. गेल्या दोन वर्षांत प्रतिलिटर १० ते ११ रुपयांची दूध दरवाढ दिली आहे.

म्हैस दुधाला जादा मागणी

ग्राहकांकडून गोकुळच्या म्हैस दुधालाच जास्त मागणी आहे. त्या तुलनेत गाय दुधाची मागणी कमी आहे. म्हैस दुधाचा पुरवठा वाढला पाहिजे आणि म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस दूध खरेदी दरात वाढ दिली असल्याचे डोंगळे यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाल्या होत्या शौमिका महाडिक

संचालकांवर होणारा ३० लाखांचा खर्च ५० लाखांवर गेला आहे. संघाच्या जीवावर स्वतः च्या चैन्यांसाठी शेतकन्यांचे खिसे कापणे बंद करून कपात केलेला गाय दूध दर पुन्हा वाढवून दिला पाहिजे. दर वाढवला नाही तर शेतकन्यांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढली जाईल. सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांनी काटकसर करून कपात केलेली रक्कम गेली कोठे,' असा सवाल गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

'सत्ताधाऱ्यांना दूध दर वाढवायचा नाही. इतर संघांपेक्षा गोकुळचा दर जास्त असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, इतर संघांपेक्षा जिल्ह्यात दूध उत्पादकांची गोकुळसोबत नाळ जोडली आहे.

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी दूध खरेदी दर वाढवला असतानाही विक्री दर वाढवला नाही. त्यानुसार बाहेरील राज्यातील दूध खरेदीचे दर कमी करून केवळ कोल्हापूर जिल्ह्यात कपात केलेला दर वाढवला पाहिजे. शेतकरी स्वतः आंदोलन हातात घेत आहेत.

दूध उत्पादकांनीही संघाच्या कार्यालयाची मोडतोड न करता रास्त मागनि आपला दर मिळवला पाहिजे. ३०-३५ वर्षांच्या काळात आम्ही संघ तोट्यात आहे, अशी कारणे सांगून शेतकऱ्यांचा खिसा कापला नाही. गोकुळचे पदार्थ सर्वात दर्जेदार आहेत. सर्व व्यवहार रोखीने होतात. सत्ताधाऱ्यांचे नेते काटकसर करून पैशांची बचत केल्याचे सांगत आहे. ही बचत केलेली रक्कम गेली कोठे ?' असा सवाल शौमिका महाडिक यांनी केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT