Pomegranate Rate agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Rate : राज्यात डाळिंबाला सर्वात उच्चांकी दर, जागेवरच मिळाले किलोला २२४ रुपये

Pomegranate Production : यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली आहे.

sandeep Shirguppe

Satara Pomegranate Production : सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील बोडकेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाला जागेवर २२४ रुपयांचा भाव मिळाल्याने राज्यातील उच्चांकी दर मिळाला आहे. या उच्च दरामुळे डाळिंब उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळेच या फळाला इतका उच्च दर मिळाला आहे.

बोडकेवाडी या गावात पूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष होते. तालुक्यात पावसाचे प्रमाणही कमी आणि सिंचनाच्या सुविधा नव्हत्या; परंतु मागील काही वर्षांमध्ये परिसरात सिंचनाची सोय झाली. शिवारात पाणी खळखळू लागल्याने बळीराजा सुखावला. तरीसुद्धा हलक्या प्रतीच्या जमिनीमुळे अत्यल्प उत्पन्न मिळत होते.

दरम्यान, युवा शेतकरी हणमंत सस्ते यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले. त्यांनी सर्व अभ्यास करून तसेच माहिती घेऊन दोन एकरावर भगवा या प्रजातीच्या डाळिंबाची लागवड केली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी डाळिंबाची बाग फुलवली. अतिशय मोहक आणि दर्जेदार फळ त्यांच्या बागेला लागले. त्यामुळे परराज्यातून व्यापारी त्यांच्या शेतात पोचले. त्यांच्या मालासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाल्याने बंगळूर येथील व्यापाऱ्याने सस्ते यांच्या डाळिंबाला २२४ रुपये इतका भाव दिला.

या दरामुळे शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले असून, अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा आता होऊ लागली आहे.

दोन एकरांत ३३ लाख ६० हजारांचे उत्पन्न!

बोडकेवाडी येथील सस्ते कुटुंबीयांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. बंगळूर येथील व्यापाऱ्यांनी ही बाग जागेवर खरेदी केली. त्यामुळे त्यांना दोन एकरांत ३३ लाख ६० हजार रुपयांचे डाळिंबाचे उत्पन्न घेतले. त्यासाठी त्यांना चार लाख रुपये खर्च आला असला तरी त्यातून कितीतरी पटीने त्यांनी फायदा झाला आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी आता आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक बोडकेवाडी या ठिकाणी येऊ लागले आहेत.

तेल्या व मर रोगाच्या संकटामुळे डाळिंब बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. डाळिंब शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना अशा परिस्थितीत डाळिंबाची रोपांचे योग्य नियोजन व निगा राखून योग्य प्रकारे जतन, पालनपोषण करून बाग वाढवली व त्याचे फळ आम्हा कुटुंबीयांना भेटले असल्याचे मत हणमंत सस्ते यांनी मांडलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

Parbhani Voting Percentage : परभणी जिल्ह्यात सरासरी ७१.४५ टक्के मतदान

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Vote Turnout : मतदानाचा टक्का वाढला, आता लक्ष निकालाकडे

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

SCROLL FOR NEXT