Water Contamination Agrowon
ॲग्रो विशेष

Water Contamination : जळगावात २०५ जलस्रोतांत ‘नायट्रेट’चे प्रमाण जास्त

Nitrate In Water : जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तातडीने त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यंदाही भूजल विभागाने जिल्ह्यातील १ हजार ४८७ गावांतील २ हजार ५०७ पाणीस्रोतांची तपासणी केली. या तपासणीत १७१ गावांमधील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले.

या स्थितीची गंभीर दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

त्यावेळी मंत्री पाटील यांनी ‘शुद्ध पाणी, सुरक्षित आरोग्य’ हे शासनाचे धोरण अंमलबजावणीसाठी तत्काळ उपाययोजना करण्यासाठी दूषित जलस्रोतांचे पुन्हा नमुने घेऊन तातडीने परीक्षण करण्याचे तसेच सध्या १०७ गावांमधील २०५ जलस्रोत बंद करून पर्यायी स्रोताद्वारे त्या गावांना सुरक्षित पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा, याबाबत सूचना दिल्या.

गावातील पाणीपुरवठा टाक्या व जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण करून परिसर स्वच्छ करण्यात यावा. प्रत्येक ग्रामपंचायतींनी परिसर स्वच्छ ठेऊन टीसीएलचा वापर करून पाणी स्वच्छ करण्यास प्राधान्य द्यावे. पाणीपुरवठा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतींसोबत समन्वय ठेवून तातडीने उपाय योजनांबाबत अंमलबजावणी करावी.

विशेषतः शेतकरी बांधवांनी नायट्रेट प्रदूषणाचे दुष्परिणाम लक्षात घेता पारंपरिक युरियाचा कमी वापर करून केंद्र सरकारने अनुमोदित केलेल्या नॅनो युरियाचा वापर वाढवावा. पालकमंत्री पाटील म्हणाले, की प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ देता कामा नये. प्रशासनाने तातडीने कारवाई करून जलस्रोत सुधारावेत.

नैर्सगिक जलस्रोत प्रदूषित होण्याची भीती

शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या खतांमधले रासायनिक घटक मातीच्यामार्फत नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाझरत असल्याने जलसाठ्यांमध्ये ‘नायट्रेट’ आढळत आहे. पाणीपुरवठा विभागाने केलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT