Swarali Pawar
कमी पाण्यात आणि कोरडवाहू क्षेत्रातही चांगली येणारे पीक म्हणून करडईचा विचार करता येतो. मात्र योग्य वाण निवडल्यास उत्पादन आणि नफ्यात चांगली वाढ होऊ शकते.
भीमा वाण १३० ते १३५ दिवसांत तयार होतो आणि हेक्टरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन देतो. फुले कुसुमा १३५ ते १४० दिवसांत तयार होऊन हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन देतो.
फुले करडई ७३३ हा कोरडवाहू क्षेत्रासाठी योग्य वाण असून १२० ते १२५ दिवसांत तयार होतो. या वाणाचे हेक्टरी १३ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
एसएसएफ ७०८ हा कोरडवाहू आणि बागायती दोन्ही क्षेत्रांसाठी योग्य वाण आहे. कोरडवाहूत १३ ते १५, तर बागायतीत हेक्टरी २० ते २२ क्विंटल उत्पादन मिळू शकते.
फुले नीरा आणि फुले भिवरा हे कोरडवाहू तसेच बागायतीसाठी चांगले पर्याय आहेत. फुले किरण १२५ ते १३० दिवसांत तयार होऊन कोरडवाहूत १५ ते १७ क्विंटल उत्पादन देतो.
फुले गोल्डमध्ये सुमारे ३४.६ टक्के तेलाचे प्रमाण असून हा वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होतो. कोरडवाहूत १५ ते १७, तर बागायतीत हेक्टरी २० ते २२ क्विंटल उत्पादन मिळू शकते.
पीबीएनएस १२ हा मावा किडीसाठी प्रतिकारक, तर फुले भूमी हा मावा आणि करपा यासाठी प्रतिकारक वाण आहे. बिनकाटेरी वाण हवे असल्यास एसएसएफ ६५८ आणि नारी ६ हे पर्याय विचारात घेता येतात.
विदर्भासाठी प्रसारित केलेला अकोला पिंक हा वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होतो. कोरडवाहू क्षेत्रात हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन देणारा हा वाण योग्य पर्याय ठरू शकतो.