Mango Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cultivation : अतिघन केसर आंबा लागवड आर्थिकदृष्ट्या फायद्याची

Mango Orchard : अतिघण लागवडीच्या बागेतून एप्रिलच्या सुरुवातीसच माल काढणीस येतो. इंग्लंड, अमेरिका, जपान या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपला माल फार मोठ्या प्रमाणात निर्यात होतो.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : अति घन केसर आंबा लागवडीतूनच कमी मजुरांमध्ये तिसऱ्याच वर्षी आणि अगदी एप्रिलच्या सुरवातीलाच माल काढायला येणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो, असे मत महाकेसर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष तथा गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

ॲग्रो इंडिया गट शेती संघाचा 242 वा गट शेती शेतकरी सुसंवाद मेळावा खांडी पिंपळगाव (ता. खुलताबाद येथे नाशिकचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या आधुनिक पद्धतीने उभारलेल्या अति घन लागवड आंबा बागेत शिवार फेरी करून झाला. यावेळी डॉ. कापसे यांनी सादरीकरणातून आंबा अतिघन लागवडीतुन निर्यात योग्य उत्पादन कसे घेता येईल, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. कापसे म्हणाले, की अतिघण लागवडीच्या बागेतून एप्रिलच्या सुरुवातीसच माल काढणीस येतो. इंग्लंड, अमेरिका, जपान या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपला माल फार मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. शेतकरी जर गट पद्धतीने अति घन आंबा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यास तयार असतील तर सावित्रीबाई फुले एनजीओ बरोबर आपणही या भागातील शेतकऱ्यांना पुढील तंत्रज्ञान देण्यास तयार आहोत, असे सांगितले.

यावेळी मोहोरातील नर व संयुक्त फुलांची ओळख, भुरी रोगाची तसेच मोहरावर येणाऱ्या विविध किडींची सविस्तर माहिती देऊन या मोहराचे संरक्षण, फळाचा आकार वाढवणे दर्जा राखणे, निर्यात आदी विषयी मार्गदर्शन केले. श्री. चव्हाण म्हणाले, की डॉ. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली या बागेतून एकरी साधारणतः चार ते साडेचार टन माल मिळण्याचा अंदाज अंदाज आहे.

जिल्हा विकास यंत्रणेचे प्रोजेक्ट डायरेक्टर अशोक शिरसे यांनीही त्यांच्या बागेविषयी माहिती दिली. यावेळी आंबा बागायतदार उमेश शिंदे यांनी आपले अनुभव कथन केले. तर कापूस तज्ज्ञ डॉ. बैनाडे यांनी कापसाविषयी थोडक्यात तांत्रिक माहिती दिली. कार्यक्रमास ॲग्रो इंडियाचे प्रमुख श्री. लक्ष्मण सवडे, श्री गायके, भगवान बनकर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT