India Vs Pakistan War Agrowon
ॲग्रो विशेष

India Pakistan War: महाराष्ट्रात ‘हाय अलर्ट’; महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

High Alert Maharashtra: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख ठिकाणी 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने सिमेलगच्या जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील काही ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात महत्वाची बैठक झाली. त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ड जारी करण्यात आला. मुंबई पोलिंसानाही सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले. 

पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तान भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला. महाराष्ट्रातही हाय अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई आणि इतर महत्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे राज्यातील महत्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनाही दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी मुंबई पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 

गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारताच्या जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमधील काही ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय लष्कराने पाकिस्तानची तीन तढाऊ विमाने पाडली. आधुनिक एस ४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने पाकिस्तानने डागलेल्या ८ क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मनसुब्यावर पाणी फेरले. 

केंद्रीय गृहविभागाने सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महत्वाच्या धार्मिक स्थळे, महत्वाची इतर ठिकाणे, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT