Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain Update : कोकणात जोरदार सरी, पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या सरी

Rain News : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरूच आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरूच आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस पडला. या पावसामुळे भात रोपे तरारली आहेत.

सध्या पावसासाठी पोषक वातावरण आहे. घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा धरण क्षेत्रात सर्वाधिक १६३, तर कोयना (नवजा) धरणक्षेत्रात १०० मिलिमीटर पाऊस पडला.

अंबोणे धरणक्षेत्रात ६८ मिलिमीटर, शिरगाव ३७, कोयना (पोपळी) ३९, दावडी ४७, तर डुंगरवाडी परिसरात ४२ मिलिमीटर पाऊस झाला. भातसा घाटमाथ्यावर ५५ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे धरणांतील पाणीपातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. सिंधुदूर्गमधील अंबोली मंडलात सर्वाधिक ७३.५, कणकवली मंडलात ७२.०, तर फोंडा येथे ७०.५ मिलिमीटर पाऊस पडला. रायगडमधील आंबेलोली आणि पालगड मंडलात ५४.५, तर रत्नागिरीतील पुनस मंडलात ६९.३ मिलिमीटर पाऊस पडला.

पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी बरसत आहेत. पुणे जिल्ह्यातील वेल्हा मंडलात ६४.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर भोर, मावळ, मुळशी तालुक्यांतही हलका पाऊस झाला. साताऱ्यातील महाबळेश्‍वर मंडलात ७०.८ मिलिमीटर, तर तापोळा मंडलात ५८.३ मिलिमीटर पाऊस पडला. कोल्हापुरातील बांबवडे मंडलात ६०, तर आंबा मंडलात ६६.३ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

रविवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतचा मंडलनिहाय पाऊस : स्त्रोत - कृषी विभाग

कोकण : वाकवली ५०.५, खेड ५०.५, भरणे ५१.०, ५४.५, देव्हळे ५०.८, लांजा ५४.५, पुनस ६९.३, विलवडे ५०.३, बांदा ६२.०, सांगवे ५७.०, भेडशी ५१.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT