Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : महापूर, अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण, पन्हाळा तालुक्यात २१ हजार शेतकऱ्यांना फटका

Kolhapur Flood : महापुराने व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या २१ हजार शेतकऱ्यांच्या उसासह विविध खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

sandeep Shirguppe

Panhala Flood : पन्हाळा तालुक्यात असलेल्या कुंभी-कासारी व जांभळी नाद्यांना यंदाच्या पावसाळ्यात आलेल्या महापुराने व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या २१ हजार शेतकऱ्यांच्या उसासह विविध खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये १५ कोटी ८७ लाख ४४ हजार ९२० रुपयांचे नुकसान झाले आहे.

यावर्षी जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कुंभी-कासारी व जांभळी नद्यासह ओढ्या-नाल्यांनाही पूर आला होता. या पुरामुळे नदीकाठावरील पिके अनेक दिवस पाण्याखाली राहिली होती. काही ठिकाणी काठावरील शेतजमिनीतील कोवळी पिके वाहून गेली होती. या सर्वांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. या पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

तालुक्यातील ३८२ हेक्टर क्षेत्रातील खरीप, जिरायत पिकांचे ५४ लाख २९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ५ हजार ५४१ हेक्टरमधील बागायत पिकांचे १५ कोटी ३३ लाखांचे नुकसान झाले आहे. यावेळी ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत. भरपाईसाठी ३ हेक्टर क्षेत्राची मर्यादा असेल.

या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली आहे. हे पंचनामे तहसीलदार माधवी शिंदे जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी पूर्ण केले.

जिरायत पिके

१३ हजार ६००, किमान १ हजार

बागायत पिके

२७ हजार, किमान २ हजार रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT