Gdachiroli News : जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नव्या पुलांचे बांधकाम सुरू असून पर्यायी व्यवस्था म्हणून बांधलेले तात्पुरते रस्ते वाहून गेले. तर काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरातील मांगदा - कुलकुली मार्गावर लहान पूल असल्याने पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जाऊन संपर्क तुटत होता. येथे नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु बांधकाम अपूर्ण असल्याने व तात्पुरत्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रपटा वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.
आरमोरी तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर कुलकुली हे गाव आहे. आरमोरी ते अंगारा- कुलकुली मार्गे बस सुरू असल्याने विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षणासाठी येत असतात. दरम्यान धानोरा तालुक्यातील पन्नेमारा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या होचेटोला या गावाचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.
३८ ते ३९ घरे असलेल्या या गावाची लोकसंख्या जवळपास १४० ते १५० च्या आसपास आहे. गावाला लागून कठाणी नदी आहे. या नदीला मागील तीन दिवसांपासून पूर आलेला आहे. त्यामुळे होचेटोला गावाचा संपर्क तुटलेला आहे.
होचेटोला येथील गर्भवती स्त्री जुगवंती जाडे नदीला पूर असल्यामुळे रुग्णालयात जाऊ शकली नाही. तिच्या घरीच तिची प्रसूती करण्यात आली. पावसाळ्यात गावाचा संपर्क नेहमीच तुटलेला असतो, अशी माहिती होचेटोलाचे संतलाल हलामी यांनी मोबाईलवर सांगितले. पन्नेमारा गावाचे पोलिस पाटील या गावाची माहिती घेत आहेत.\
कुरखेडा तालुक्यातील अनेक मार्ग बंद
मंगळवारी (ता. १) प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ६४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक १७०.५ मिमी पावसाची नोंद देसाईगंज तालुक्यात झाली आहे. पुरामुळे मंगळवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार कुरखेडा-मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ कुरखेडा तालुक्यातील (खोब्रागडी नदी), मांगदा ते कलकुली मार्ग (ता. आरमोरी), आंधळी-नैनपुर-आरमोरी (आंधळी पुल सती नदी) (ता. कुरखेडा), रामगड-उराडी रस्ता (ता. कुरखेडा), कुरखेडा-तळेगाव-पळसगाव रस्ता (ता. कुरखेडा), कढोली ते उराडी रस्ता (ता. कुरखेडा, लोकल नाला) हे मार्ग बंद झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.