Heavy Rain Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Kolhapur : घाटमाथ्यासह कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, पंचगंगेची पाणी पातळी ५ तास स्थिर

Radhanagari Dam : दिवसभरात राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत काही इंचांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Flood : ४ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला होता; परंतु काल आणि आज पुन्हा पावसाने धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे ४ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. चार दरवाजांमधून ७२१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी आज सकाळपासून ५ तासांहून अधिक ४२.५ इंचावर स्थिर राहिली आहे.

सद्य:स्थितीत पंचगंगा धोक्याच्या ४२ फूट ५ इंचांवर वाहत आहे. आलमट्टी व कोयना धरणांतून विसर्ग वाढविला आहे. काल दिवसभरात राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत काही इंचांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या आलमट्टी व कोयना धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला. आलमट्टी धरणातून साडेतीन लाख क्युसेक तर कोयना धरणातून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून १०,५८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ७६ बंधारे पाण्याखाली आहेत.

पावसामुळे जिल्ह्यात घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड होऊन ६६ लाख ६२ हजारांचे नुकसान झाले, तर सात शेळ्या व एक बैल मृत होऊन सुमारे एक लाख २० हजारांचे नुकसान झाले. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रात झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल यंत्रणेकडून आजही सुरू राहिले. दरम्यान, शहरात पाणी ओसरलेल्या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तसेच या ठिकाणी स्वच्छता व औषध फवारणीचे काम महापालिकेकडून सुरू होते.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५५.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले- १२.८ मिमी, शिरोळ -१०.५ मिमी, पन्हाळा- २८.४ मिमी, शाहुवाडी- ३३.५ मिमी, राधानगरी- १८.४ मिमी, गगनबावडा- ५५.८ मिमी, करवीर- १४.८ मिमी, कागल- १३.९ मिमी, गडहिंग्लज- ११.२ मिमी, भुदरगड- ३२.४ मिमी, आजरा- २३.७ मिमी, चंदगड- ३७.७ मिमी असा एकूण २१.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी ८.२७, तुळशी ३.२९, वारणा २९.६०, दूधगंगा २२.१८, कासारी २.३१, कडवी २.५२, कुंभी २.३७, पाटगाव ३.७२, चिकोत्रा १.४५, चित्री १.८९, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.२४, सर्फनाला ०.४८ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT