Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी

Crop Damage Due To Rain : राज्यात थंडी वाढत असताना मान्सूनोत्तर पावसाने रविवारी (ता.२६) सायंकाळी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : राज्यात थंडी वाढत असताना मान्सूनोत्तर पावसाने रविवारी (ता.२६) सायंकाळी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. टाकळीहाजी परिसरात गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीसाठी हा पाऊस पोषक असला तरी तरकारी आणि फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.

उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर, हवेली, मावळ, मुळशी अशा काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग, खेडमधील पश्चिम भागात दुपारी तीननंतर सोसायट्याचा वारा, विजांच्या कडकडाट, मेघगर्जना, गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळला. जुन्नर तालुक्याच्या काही भागांत मध्यम तर काही भागांत हलका पाऊस बरसला. या अचानक आलेल्या पावसासह गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

मागील काही दिवसांपासून हवेलीतील वाढलेली उष्णता तसेच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांना धास्ती लागली होती. भात पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. कांदा लागवडीला झालेली सुरवात, तयार झालेली कांदा रोपे, काही ठिकाणी आंब्याला आलेला मोहर यावर पाऊस बरसल्याने नुकसान झाले आहे.

गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्याने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. रब्बी हंगामातील कांद्याच्या पिकाला फटका बसणार आहे. शेतीमालाचे कमी झालेले दर व अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत.

आंबेगाव तालुका जवळपास पूर्ण, खेड तालुक्यातील चास, कमान, कान्हेवाडी, कडधे, वाडा तसेच चिखलगाव, कळमोडी, सुरकुंडी, माजगाव, दोओसी, साकुर्डी, औदर यांसह अनेक भागांत तर शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी, पाबळ, कवठे येमाई, सविंदणे, वडनेर खुर्द, फाकटे चांडोह, निमगाव दुडे आदी परिसरात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळला. त्याचा पिकांना मोठा फटका बसला.

शहर, उपनगरांतही जोरदार ः

रविवारी संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरींना सुरवात झाली. अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी पाणी झाले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, त्यात सिग्नल यंत्रणा बंद झाल्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. कोथरुड, बावधन, कात्रज, स्वारगेट, हडपसर, येरवडा, औंध, पाषाण, शिवाजीनगर, खराडी, वाघोली यासह अन्य भागांत जोरदार पाऊस झाला.

कांदा रोपे भुईसपाट

कांदा लागवडीसाठी आलेली रोपे भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सर्वाधिक फटका बटाटा, कोथिंबीर, मेथी, शेपू यांसारख्या भाजीपाला पिकांना बसला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे भाजीपाला पिके सडून जाण्याची शक्यता आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सर्वत्र गारांचा खच

अनेक ठिकाणी कौलारू घरांची कौले फुटली. शेतात व अंगणात सर्वत्र गारांचा खच पाहायला मिळाला. वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. गारपिटीचा कांद्याची रोपे, मका, चारा पिके, गहू, ज्वारी, हरभरा, फ्लॉवर, कोबी या पिकांसह फळझाडांना मोठा फटका बसला आहे. उभी पिके भुईसपाट झाली आहेत.

भात पिकांना फटका

सध्या भात कापणी व झोडणीची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी कापणी केली आहे. तर काही ठिकाणी कापणी केलेल्या भात पिकाची झोडणी सुरू आहे. त्यातच ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT