Nagar Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात पावसाचा दुसऱ्या दिवशीही जोर

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस कंधार, लोहा, मुखेड, माहूर, बिलोलीत जोरदार झाला. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १८.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यानुसार जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर रविवारीही पावसाचा जोर होता. शुक्रवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

हा पाऊस धर्माबाद, अर्धापूर, लोहा, हदगाव, नांदेड व मुदखेड तालुक्यात झाला होता. पावसाने प्रमाण अधिक असल्याने धर्माबाद तालुक्यातील सिरजखेड मंडळात ७४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी पावसाने पुन्हा झोडपून काढले. सततच्या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत आहे.

शुक्रवारचा पाऊस जाहूर मंडळात ५४ मिलिमीटर, चांडोळा ४२, रामतीर्थ ३६, बिलोली २९, कुंडलवाडी ४२, लोहगाव २९, कंधार ६३, कुरुळा ४४, फुलवळ २९, पेठवडस ३७, उस्माननगर ३८, बारूळ ३७, लोहा ३७, माळाकोळी ५५, कापशी २२, सोनखेड २७, कलंबर ४७, पिंपरखेड ५६, माहूर २५, वाई ४३, शिरजखेड २५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड १३.५० बिलोली २८.६०, मुखेड २८. ५०, कंधार ३६. ८०, लोहा ३१. २०, हदगाव २०. ४०, भोकर २.९०, देगलूर १०.५०, किनवट ३. २०, मुदखेड १४. ३०, हिमायतनगर ३. २०, माहूर २६.२०, धर्माबाद १७. ८०, उमरी ४, अर्धापूर १४.१०, नायगाव २०.१०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nuksan Bharpai : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने दिली २३७ कोटींच्या मदत निधीला मंजुरी

Water Projects : चाळीसगावातील नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

Sugar Factory : ‘वसाका’ वार्षिक भाडेकराराने चालवणार

Revenue Department : दीडशे गावांची जबाबदारी अवघ्या १२ तलाठ्यांवर

Water Scarcity : टॅंकरला विश्रांती, पण टंचाईचे ढग कायम

SCROLL FOR NEXT