Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नगर जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडलांत जोरदार पाऊस

Maharashtra Rain Update : नगर जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस सुरूच आहे. गुरुवारी (ता. ३०) रात्री सुमारे पन्नास महसुल मंडलांत जोरदार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणला अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस सुरूच आहे. गुरुवारी (ता. ३०) रात्री सुमारे पन्नास महसुल मंडलांत जोरदार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणला अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. एकीकडे गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, दुसरीकडे पावसाने पिकांचे नुकसानही सुरूच आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून अधून-मधून पाऊस पडत आहे. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस जोरदार वादळी पाऊस, गारपीट झाली. यात कांदा, मका, ज्वारी, चारापिके, भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.

नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. गुरुवारी रात्री विजेच्या कडकडाटासह नगर, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. रब्बीतील पिकांना फटका बसला आहे. प्रशासनाकडील नोंदीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे अतिवृष्टीची नोंद झाली. शिवाय पन्नासपेक्षा अधिक महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलिमीटरमध्ये) ः नालेगाव ः २६, सावेडी ः ५७, कापूरवाडी ः ३०, केडगाव ः ४५, भिंगार ः १५, नागापुर ः १६, जेऊर ः ५५, चिंचोडी ः २३, वाळकी ः१६, चास ः ५१, रुईछत्तीशी ः १४, पारनेर ः ६, भाळवणी ः ४१, सुपा ः ३६, वाढेगव्हाण ः ३१, निघोज ः १८, टाकळी ः २०, श्रीगोंदा ः २०, काष्टी ः १३, मांडवगण ः २५, बेलवंडी ः १९, देवदैठण ः ८६, कोळगाव ः ३१, कर्जत ः १६, राशीन ः १३, भांबोरा ः

१४, कोंभळी ः १०, मिरजगाव ः ३०, माही जळगाव ः ४५, जामखेड ः २६, अरणगाव ः ४१, खर्डा ः ५७, नान्नज ः १९, नायगाव ः ४४, शेवगाव ः २०, भातकुडगाव ः २०, बोधेगाव ः २०, चापडगाव ः २६, ढोरजळगाव ः २६, पाथर्डी ः १८, माणिकदौडी ः २०, टाकळी ः १८, कोरडगाव ः १३, करंजी ः १८, मिरी ः ३१, नेवासा खुर्द ः १४, सलाबतपुर ः २६, कुकाणा ः २६, चांदा ः १६, वडाळा ः १८, वांबोरी ः १६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT