Maharashtra Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Weather : परभणी, हिंगोलीतील ६ मंडलांमध्ये अतिवृष्टी

Rain Alert : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८१ मंडलामध्ये सोमवारी (ता. ८) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८१ मंडलामध्ये सोमवारी (ता. ८) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडलात ९२.५ मिमी, राणीसावरगाव मंडलामध्ये ७४ मिमी, पिंपळदरी मंडलामध्ये १२१.८ मिमी, पालम तालुक्यातील बनवस मंडलामध्ये ८८.५ मिमी, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आंबा मंडलात ११९.३ मिमी, कुरुंदा मंडलात ७७ मिमी अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे ओढे, नद्या प्रवाहित झाल्या. पीके पाण्याखाली गेली. जमीनी खरडून गेल्या.

परभणी जिल्ह्यातील ५१ मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. रविवारी (ता. ७) रात्री साडेदहा ते सोमवारी (ता. ८) पहाटे साडेचार वाजेपर्यंत पर्यंत अनेक मंडलात पाऊस सुरु राहिला. परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर अधिक होता.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी २४.७ मिमी, जुलै महिन्यात आजवर सरासरी ६९.४ मिमी तर यंदा १ जून पासून एकूण सरासरी २३९ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर राहिला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी १६.४ मिमी, जुलै महिन्यात आजवर सरासरी ७१.६ मिमी तर यंदा १ जून पासून एकूण सरासरी २२०.७ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्या पुढे) : परभणी १४, झरी १८.८, सिगणापूर २७, दैठणा ३८, पिंगळी १७.५, परभणी ग्रामीण १६.८, टाकळी कुंभकर्ण २१, बोरी १०, दूधगाव १०, देऊळगाव गात २०.८, कुपटा १५.८, मानवत १६, केकरजवळा १३.५, रामपुरी २०.३, पाथरी ३५.८, बाभळगाव २२, हादगाव १७, कासापुरी २९.५, सोनपेठ २०.३, आवलगाव २९.३, शेळगाव २४.८, वडगाव ३६.३, गंगाखेड ३६.८, महातपुरी ४५, माखणी ९२.५, राणीसावरगाव ७४, पिंपळदरी १२१.८, पालम ३३, चाटोरी ५४.५, बनवस ८८.५, पेठशिवणी २९.५, रावराजूर २७.५, ताडकळस २०.३, लिमला २०.८, कात्नेश्वर ३१.८, चुडावा ३४.३, कावलगाव ३७.५.

हिंगोली जिल्हा : सिरसम १३, माळहिवरा १४.३, आखाडा बाळापूर १४.८, डोंगरकडा ४१.८, वारंगा २२.५, वसमत २२.५, आंबा ११९.३, हयातनगर २२.५, गिरगाव ४८, हट्टा १०.५, कुरुंदा ७७, साखरा २१.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT