Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ४० मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यातील ४० मंडलांत रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यातील ४० मंडलांत रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली. पावसाळा संपल्यानंतर झालेल्या या पावसाने अनेक भागात चांगलीच दाणादाण केली.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्या पाठोपाठ जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, जिल्ह्यात पावसाची हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार हजेरी लागली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ मंडळात अतिवृष्टी झाली.

त्या पाठोपाठ जालना व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी १० व परभणी व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, तसेच लातूर जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. हा पाऊस रब्बीच्या पुढील पेरणीसाठी पोषक ठरणार असला तरी रब्बीसाठी रान तयार करण्यात या पावसाने व्यत्यय निर्माण केला आहे. याशिवाय खरिपातील काढणीला आलेल्या पिकाचेही या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

मंडळनिहाय अतिवृष्टी (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

पिसादेवी १२३, उस्मानपुरा ७८.३, चिकलठाण ६७.८, हरसुल ७९.५, शेकटा ६९.८, वरुडकाजी १२३, गारज ७५, देवगाव ८५, चिंचोली ८४.५, करंजखेड ८४.५, वेरूळ ८९.५, सुलतानपूर ७०.३, बनोटी ६९, बोरगाव ७४.३, फुलंब्री ७२.८.

जालना जिल्हा

जालना ग्रामीण ६५.७५, विरेगाव ८१.२५, रामनगर ७६.२५, पाचनवडगाव ७६.२५, परतूर ९३, वाटुर ७४, शेलगाव ६९, राणी उचेगाव १२०, रांजणी ८७.२५, पांगरी ६५.५०.

लातूर जिल्हा

हाडोळती ७८.७५.

नांदेड जिल्हा

नांदेड शहर ९५.२५, नांदेड ग्रामीण ७०.५०, वसारणी ६९.७५, लिंबगाव ९१.७५, तरोडा ७७.५०, गुरुला ७६, माळाकोळी ७१.७५, माहूर ७०.५०, गोळेगाव ७४.२५, अर्धापूर ६८.२५.

परभणी जिल्हा

चुडावा ६६, मोरेगाव ९४.५०.

हिंगोली जिल्हा

सेनगाव ७२.७५, गोरेगाव ७२.७५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’

Pune ZP: जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Ranbhaji Takla Modak: रानभाजी ‘टाकळा’पासून मोदक निर्मिती

Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प

Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार

SCROLL FOR NEXT