Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यातील २ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : हिंगोली व परभणी जिल्ह्यांत ८२ मंडलांत रविवारी (ता. १) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली व परभणी जिल्ह्यांत ८२ मंडलांत रविवारी (ता. १) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाकोडी मंडलात ७९.८ मिमी, आखाडा बाळापूर मंडलात ७२.५ मिमी अतिवृष्टी झाली.

हिंगोली व परभणी जिल्ह्यांत रविवारी (ता. ३१) रात्रीपासून ढगांच्या गडगडाटात संततधार पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३४ मिलीमीटर पाऊस झाला.

यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ६०९.८ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत पावसाचा जोर राहिला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २०.८ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ५८०.२ मिलिमीटर पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांत रविवारी (ता. १) दुपारनंतरही अनेक मंडलांत ढगांच्या गडगडाटात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहिला.

मंडलनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे)

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २८.५, नरसी नामदेव २३.५, सिरसम ५०.३, बासंबा ४२.८, डिग्रस कऱ्हाळे ३०.५, माळहिवरा ५०.३, कळमनुरी ५५.५, नांदापूर ४३.३, डोंगरकडा ५३.३, वारंगा ५३.३, वसमत २६.५, आंबा ४२, हयातनगर ४२, गिरगाव ५६.८, हट्टा २२.३, टेंभुर्णी ३२, कुरुंदा ४१, औंढा नागनाथ २२.५, येळेगाव ३०.५, साळणा १८, जवळा बाजार २०, पानकन्हेरगाव १६.५, हत्ता २३.

परभणी जिल्हा ः परभणी शहर २१.८, परभणी ग्रामीण ३३, पेडगाव २३, जांब १८.५, झरी ३२.८, सिंगणापूर ३२.३, दैठणा २५.३, पिंगळी १७.८, टाकळी कुंभकर्ण २०.३, जिंतूर १६.३, सावंगी म्हाळसा १८.३, बोरी २२.५, आडगाव २३.८, दूधगाव २३, ताडबोरगाव २१, बाभळगाव २०.८, कासापुरी २१, आवलगाव १६, शेळगाव गंगाखेड २६.५, महातपुरी २४.५, माखणी २४.८, राणीसावरगाव ३३.३, पिंपळदरी २८, पालम ३५, चाटोरी ३३.८, बनवस ४८.५, पेठशिवणी ३०, रावराजूर २२.५, पूर्णा ३१.८, लिमला २९.८, कात्नेश्वर ३३.३, चुडावा २८.५, कावलगाव ३०.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Agri Exports : पश्चिम आशिया देशांना भारत करतो २० टक्के शेतमालाची निर्यात; केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

Dengue Disease in Livestock: जनावरांमधील डेंगू आजार

Maharashtra Alliance Politics: आता वेळ कुबड्या हटविण्याची !

Illegal HTBT Cotton Seed: जांगडगुत्ता ‘एचटीबीटी’चा!

Rabi Onion Cultivation: रब्बीत कांद्याची विक्रमी लागवड

SCROLL FOR NEXT