Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : जालना, छत्रपती संभाजीनगर, बीडमधील १७ मंडलांत अतिवृष्टी

Rain News : मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळाला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambbhajinagar News : मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला.

त्यापाठोपाठ बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये अपवाद वगळता पावसाची हलका, मध्यम ते जोरदार हजेरी लागली. जालना जिल्ह्यातील सर्व ४९ मंडलांत पाऊस झाला. त्यापैकी दहा मंडलांत अतिवृष्टी झाली.

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४९ मंडलांत पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. अंबाजोगाईत पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. या तालुक्यात सरासरी ६०.९ मिलिमीटर पाऊस झाला. धारूर, परळी, माजलगाव, गेवराई, आष्टी, शिरूर कासार, असा क्रमाने पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ७१ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. जोरदार अतिजोरदार पावसामुळे काही भागात नदी नाले एक झाल्याचे पाहायला मिळाले.

अतिवृष्टीची मंडले (पाऊस मिलिमीटरमध्ये)

जालना जिल्हा ः राजूर ७०.३, केदारखेडा ७०, वाघरुळ ६५.३, परतूर ६६.८, वाटूर १०५.५, बावणे पांगरी ६८, घनसावंगी १०७.३, कुंभार पिंपळगाव ८०.५, तळणी ७८, ढोकसाल ९३.

बीड जिल्हा ः अंबाजोगाई ७१.५, घाटनांदूर ६६, धर्मापुरी ८१, मोहखेड ९१.३.

छत्रपती संभाजीनगर ः बालानगर १००.८, कचनेर ६७.५, ढोरकिन ६९.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT