Rain Update agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Update : पावसाचं थैमान; मुंबई एपीएमसी बंद तर नागपुरात शाळांना सुट्टी जाहीर, पंचगंगेची वाटचार इशारा पातळीकडे

Heavy Rain Update in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून मुंबई उपनगरांसह विदर्भातील विविध जिल्ह्यामंध्ये पावसाने थैमान घातला आहे.  

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता.१९) मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. तर शनिवारी (ता.२०) देखील पावसाचा जोर जैसेथे आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचे पाणी सखल भागात शिरल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. यादरम्यान विदर्भातील अमरावती आणि नागपुरमध्ये पावसाचा जोर वाढल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. 

विदर्भाला पावसाचा तडाखा

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले असून काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून येथे बामणी ते कोटगाव मार्ग वाहून गेला आहे. तर नागभीड शहरातील शिवनगरमधील काही भागात पावसाचे पाणी शिरून घरांचे नुकसान झाले आहे. तर गेल्या २४ तासात गडचिरोलीच्या सिरोंचा भागात तब्बल १८३ मिमी पाऊस झाल्याने नदी नाल्याला पूर आला. तर येथे ढगफुटी पाऊस झाल्याने एका शाळेत तब्बल ७५ विद्यार्थी अडकले. त्यांना बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहे.

विमान उड्डाणे रद्द

नागपूर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे. पावसामुळे विमान सेवा रद्द करण्यात आल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नागपूर दौरा रद्द करावा लागला आहे

नागपूरसह भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

दरम्यान हवामान विभागाने शनिवारी (ता. २०) विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागपूरसह भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. यावेळी हवामान विभागाने नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी करताना मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षिततेच्यादृष्टीने विविध निर्णय घेतले जात आहेत. तर मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये शनिवारी बंद ठेण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सांगितले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालन करावे, सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले आहे.

पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली 

कोल्हापुरमध्ये देखील पावसाने जोर धरला असून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने नद्याच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर धरण क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फुटांवर गेली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फुटांची असून सध्या नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. तर मुसळधारांमुळे जिल्ह्यातील ७४ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. 

मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार 

मुंबईसह उपनगरासह कोकणात देखील पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवार पासून मुसळधार पाऊस सुरू असून दादर, अंधेरी, हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भुयारी मार्गातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली असून पावसाचा फटका मुंबई लोकला बसला आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू असल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. तसेच पाणी साचल्याने मुंबई एपीएमसीला मोठा फटका बसला असून बाजार समिती रविवारी बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान रविवारी देखील राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT