Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

Heavy Rain In Maharashtra : काही दिवसापासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटींग सुरू झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या दोन एक दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे. रविवारी (ता. ७) राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला असून आर्थिक राजधानी मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले आहे. कोकणात पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे.

राज्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला असून रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, शहापूरला पावसाचा फटका बसला. तर राज्यातील विविध जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. दरम्यान काही नदी-नाल्यांना पूर आल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

मुंबईमध्ये पहाटेपासून संततधार

मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे. येथील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी साचले आहे. तर ठाणे, शहापूर तालुक्यात देखील अति मुसळधार पाऊस झाल्याने भारंगी नदीचे पाणी घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात विश्रांतीनंतर दमदार पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Maharashtra Rain Update
Rain Update: आज मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा

रेल्वे स्टेशनला नदीचे स्वरूप

दरम्यान शहापूर तालुक्याला शनिवारी रात्री देखील जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे कसारा व खर्डी दरम्यान असलेल्या उंबरमाली रेल्वे स्टेशन वर पावसाचे पाणी साचले होते. ज्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. तर रेल्वे वाहतूक काही काळापासून बंद करण्यात आली.

एनडीआरएफची पथके तैनात

शनिवार आणि रविवार मुंबईत पावसाची संततधार सुरू झाली आहे. तर पुढील २४ तासात मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे येथे एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे.

कोकणात बहुतांशी भागात पाऊस

यंदा पावसाने लवकर सुरूवात केली. मात्र गेल्या महिन्यात पावसाने दडी मारली. पण आता कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. . कणकवली, कुडाळ, सावंतवाडी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर जिल्ह्यातील नदी, ओढे दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Maharashtra Rain Update
Rain Update : खानदेशात काही भागांत जोरदार; अनेक मंडलांत तुरळक पाऊस

रत्नागिरी बाजारपेठेत शिरलं पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू झाला आहे. येथील रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. तर सध्या बाजारपेठेला पाण्याचा वेढा आहे.

सिंधुदुर्ग २७ गावांचा संपर्क तुटला

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात काही तासांतच जोरदार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.

सोलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस

सोलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर महापालिकेचा भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. पावसामुळे तुंबलेले ड्रेनेजचे पाणी हांडे परिसरातील घरांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर

पंचगंगा नदी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली असून जिल्ह्यातील ३८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी दिसत असला तरिही घाटमाथ्यावर पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याव सध्या पाणीपातळी २८' ०५" फुटावर आली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुटांवर आहेत. तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे.

सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा

रविवारी (ता.७) सकाळीच गगनबावडा तालुक्यातील वेसरफ तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. तर सांडव्यावरून १२५ क्यूसेक्स वेगाने पाणी प्रकल्पाबाहेर पडत आहे. नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com