Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : सिंधुदुर्गात किनारपट्टीसह सर्वत्र मुसळधार पाऊस

Rain Update : किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पहिल्यांदाच मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा हंगामाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीसह जिल्ह्यात सोमवारी (ता. २०) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पहिल्यांदाच मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे आंबा हंगामाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) देखील सकाळपासून पावसाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी एक वाजेपासून सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांत वाऱ्याचा वेगदेखील वाढला होता. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांमध्ये वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

पहिल्यांदाच देवगड, मालवण तालुक्यांत देखील मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वेंगुर्ला तालुक्यात देखील पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात सर्वत्र तासभर अधिक मुसळधार पाऊस झाल्यामुळे मॉन्सूनसदृश वातावरण निर्माण झाले होते. हवेत देखील गारवा निर्माण झाला होता.

वादळीवारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीचे प्रकार घडलेले आहेत. वैभववाडी तालुक्यात कुसुर येथे घराच्या अंगणात झाड कोसळले. काही ठिकाणी वीजखांब, वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

काही शहरांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. देवगड, मालवण, वेंगुर्ला या भागांत मोठ्या प्रमाणात आंबा झाडावर शिल्लक आहे. पावसामुळे या आंब्याचे नुकसान होणार आहे. आंबा हंगाम अजूनही आठ ते दहा दिवस सुरू राहील अशी अपेक्ष बागायतदारांना होती. परंतु पावसामुळे हंगाम संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आज सकाळपासून देखील पावसाचे वातावरण आहे. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Bank: कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकरी, व्यावसायिकांसाठी विविध योजना; शैक्षणिक कर्जाचा व्याजदर १२ वरून ८ टक्क्यांवर

Irrigation Project: विदर्भ, मराठवाड्यातील शेती आणि पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला गती; ९८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Chia Farming : बदलत्या हवामानात चिया पीक देईल आर्थिक स्थैर्य

Illegal Liquor Shop : दारूबंदीसाठी महिलांचे आंदोलन

Rabi Jowar Variety : रब्बी ज्वारी लागवडीसाठी वाण

SCROLL FOR NEXT