Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मुसळधार पाऊस अन् गारपिटीने राज्यात रब्बी पिकांना फटका, फळबागांचेही मोठे नुकसान

Damage to Rabi Crops : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विदर्भातील रब्बी पिकांना फटका बसला असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी (२६ रोजी) रात्री जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. याचा रब्बी पिकांना फटका बसला असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर आज हवामान विभागाने नागपूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा विदर्भातील शेतकरी आस्मानी संकंटात सापडला आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह खानदेशात सोमवारी रात्री जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिक आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

तात्काळ मदत मिळणार

दरम्यान आज मांडण्यात येणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या आधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले. त्यांनी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिके आणि फळबागांच्या नुकसानीपोटी भरीव तरतूद करावी अशी मागणी लावून धरली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यावरून वक्तव्य केले आहे. फडणवीसांनी याप्रकरणी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल अशी माहिती विधानभवनात दिली आहे.

बुलढाण्यातील रस्ता बर्फाने झाकला

बुलढाणा जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतासह रस्तेही गारांनी झाकले गेले. तर काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले असून चिकूच्या बांगाना फटका बसला आहे. तसेच गारांचा पाऊस झाल्याने चिखली देऊळगावराजा रोडला बर्फाचे स्वरूप आले होते.

वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले

मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याने बुलढाण्यातील रस्ते बर्फाने झाकले गेले होते. तर जळगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांना सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढले.

अकोल्यात विद्युत पुरवठा खंडीत

हवामान विभागाने २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राज्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे अकोल्यात झालेल्या विजांच्या कडकडासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला.

द्राक्षबागा भुईसपाट

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीत तालुक्यात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे द्राक्षबाग भुईसपाट झाल्या. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

शेतीचे नुकसान

हवामान विभागाने २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळ, गारपीट अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कांदा, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा या रब्बी पिकांसह फळबागा जमीनदोस्त झाल्या.

'या' जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाने २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. त्याप्रमाणे विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर आज २७ फेब्रुवारी रोजी वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना २८ फेब्रुवारी रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

SCROLL FOR NEXT