Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : तीन जिल्ह्यांत सर्वदूर पावसाची दमदार हजेरी

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील पाच मंडलांचा अपवाद वगळता सर्वदूर हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस झाला. १३ मंडलांत अतिवृष्टी झाली. बीडमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता.

छत्रपती संभाजी नगरमधील सर्व ८३ मंडलांत पावसाची सरासरी १९.९ मिलिमीटर हजेरी लागली. जिल्ह्यातील तुर्काबाद व चिखलठाणा मंडलांत अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी १७.८ मिलिमीटर, फुलंब्रीत ६.३ मिमी, खुलताबादमध्ये १६.१, पैठणमध्ये ११.२, सोयगावमध्ये १३.४, सिल्लोडमध्ये १४.४, कन्नडमध्ये २०.९, वैजापूरमध्ये २३.२ तर गंगापूर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४०.२ मिमी पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४८ मंडलांत पावसाची हलकी मध्यम दमदार तर काही मंडलांत जोरदार हजेरी लागली. जिल्ह्यातील जालना ग्रामीण व केदारखेडा मंडलांत अतिवृष्टी झाली. जालना तालुक्यात सरासरी २५.१ मिलिमीटर, जाफराबादमध्ये २९ मिमी, भोकरदन १८.९, अंबडमध्ये ६.२, परतूरमध्ये १३.६, बदनापूरमध्ये १२.२, घनसावंगीत ७ तर मंठा तालुक्यात सरासरी १९.४ मिमी पाऊस झाला.

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला ७७ पैकी ७३ मंडलांमध्ये पावसाची हलकी मध्यम दमदार ते जोरदार हजेरी लागली. जिल्ह्यातील बीड तालुक्यात सरासरी ६७.६ मिमी अतिवृष्टी नोंदली गेली.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : छत्रपती संभाजीनगर २९.३ उस्मानपुरा २६.५, कांचनवाडी २०.८, लाडसावंगी ३०.३, चौका ३५.३, कचनेर ३२.८, पंढरपूर २१, नांदर २२.८, ढोरकीन ३६, गंगापूर ६०.५, मांजरी ४९.८, भेंडाळा ४८.३, वाळुज ५३.५, सिद्धनाथ वडगाव ५१.८, जामगाव ४९, वैजापूर २५.८, खंडाळा २७.८, शिवूर ५२.८, बोरसर ५२.८, जानेफळ ४८.३, नागद २४.५, सुलतानपूर ३४.३, गोळेगाव २०.३, पालोद ५९.५, सोयगाव २०.५, .

जालना जिल्हा : जालना शहर २१.८, विरेगाव ६२.५, राजूर ३५.८, जाफराबाद ३७.३, माहोरा ४७.५, टेंभुर्णी २१.३, वरुड बुद्रुक २०.३, जामखेड २०.५, परतूर २०, वाटुर २१.५, श्रीष्टी २०, शेलगाव २९.९, घनसावंगी ४०.८, मंठा ४५, पांगरी गोसावी २२.

बीड जिल्हा : बीड ६३.५, नेकनूर ३२.५, दासखेड ३२.८, दावला वडगाव २३, पिंपळा ६३.३, जातेगाव २३, नित्रुड २४.५, दिंद्रुड ३५.५, बर्दापूर २४ युसूफ वडगाव २३.८, होळ २२.८, विडा ३५.३, बनसारोळा २०.८, परळी ५१, नागापूर २४.३, सिरसाळा २३.५, पिंपळगाव गाढे ५६.५, तेलगाव २९.३, वडवणी २६.३, रायमोहा २२.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडले आणि पाऊस (मिमीमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : तुर्काबाद ८३.५, चिकलठाणा ७९.८

जालना जिल्हा : जालना ग्रामीण ६६.८, केदारखेडा ७६.८

बीड जिल्हा : पाली १०१, धारूर ९६, पेंडगाव ११२.७५, मांजरसुंबा ९३, चौसाळा १११.५, लिंबागणेश ९५.२५, नवगण राजुरी ९४.५, घाटनांदूर ८३.७५, केज ६६.७५, चऱ्हाटा ८७.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

Proso Millet : आरोग्यदायी पौष्टिक भगर

Poultry Farming: कोंबड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक

Horticulture : द्राक्ष, डाळिंब शेतीत शिंदे बंधूंचा लौकिक

Sangli Coconut Auction : कोथिंबिरीची जोडी १० हजार ५०० तर एक नारळ ६५ हजारांना, काय आहे हा विषय?

SCROLL FOR NEXT