Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Vidarbha Rain : पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर ओसरला

Monsoon Rain Update : गेले काही दिवस सातत्याने हजेरी देत असलेला पाऊस मागील २४ तासांत बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

Team Agrowon

Akola News : गेले काही दिवस सातत्याने हजेरी देत असलेला पाऊस मागील २४ तासांत बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. सोमवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार अकोट तालुक्यात सर्वाधिक ११.३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात अकोट मंडलात १३.८ मिलिमीटर पाऊस झाला. तर मुंडगाव ९.३, पणज १०.५, चोहोट्टा ७, कुटासा ३.५, आसेगाव बाजार १०.३, उमरा मंडलात सर्वाधिक १८ तर अकोलखेडमध्ये १७.८ मिलिमीटर पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड मंडलात १०.८, अडगाव बुद्रूक १४.८,बाळापूर ४, पातूर २.९, अकोला २.३, बार्शीटाकळी १.४, मूर्तिजापूर ८ मिलिमीटर पाऊस झाला.

बुलडाणा जिल्हयात जळगाव जामोद तालुक्यात १८, संग्रामपूर ५.४, चिखली १.१, बुलडाणा ०.३, देऊळगावराजा ०.२, मेहकर २.१, सिंदखेडराजा ०.३, लोणार ०.१, खामगाव ७.५, शेगाव ७.२, मलकापूर २५.६, मोताळा ४.७, नांदुरा १६ मिलिमीटर पाऊस झाला.

वाशीम जिल्ह्यात जोर कमी

पश्‍चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर बराच कमी झाला आहे. जिल्हाभरात कुठल्याही तालुक्यात ५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. वाशीम, रिसोड, मानोरा, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर या तालुक्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. सर्वाधिक २.९ मिलिमीटर पावसाची नोंद मंगरूळपीरमध्ये आहे. यावरून वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर किती कमी झाला हे स्पष्ट दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT