Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain Update : सटाणा, देवळ्यात काही ठिकाणी जोरदार सरी

Latest Rain Update : यंदा पावसाची वाट पाहावी लागली होती. मात्र आता काही ठिकाणी मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Nashik News : चालूवर्षी मॉन्सूनने अनेक ठिकाणी समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली होती. मात्र मॉन्सून परतून गेल्यानंतर सोमवारी (ता. १६) रोजी दुपारनंतर सटाणा व देवळा तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मालेगाव व कळवण तालुक्यात हलक्या सरी बरसल्या आहेत.

यंदा पावसाची वाट पाहावी लागली होती. मात्र आता काही ठिकाणी मॉन्सूनोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कसमादे भागातील सर्वच तालुक्यांमध्ये जून ते १६ ऑक्टोबरपर्यंतही यंदा पावसाने सरासरी गाठले नाही.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यात फक्त कळवण तालुक्यात ९५ टक्के सरासरी पाऊस आहे. तर मालेगाव, सटाणा तालुक्यात ७० टक्क्यांवर तर देवळा तालुक्यात ६८ टक्के सरासरी पाऊस आहे.

त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून होती. अशातच सटाणा, सटाणा तालुक्यातील दसवेल पिंपळकोठे, ताहाराबाद बिजोटे, भुयाने परिसरात मध्यम ते हलका पाऊस झाला. करंजाड व मोसम खोऱ्यात पावसाने हजेरी लावली. जिरायती भागात दिलासा देणारा आहे. देवळा तालुक्यातील वाखरी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

मालेगावातील सतमाने परिसरात मध्यम ते हलका पाऊस झाला. कळवण तालुक्यात आभोणा, नाकोडा परिसरात मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. नांदगावात साकोरा परिसरात रिमझिम सरी बरसल्या.

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात सकाळपासून उन्हाचा चटका खुपच होता. ढग दाटून आले; पण पाऊस झाला नाही नाशिक शहर परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. येवला, चांदवड, सिन्नर तालुक्यात उन्हाचा चटका होता.

उन्हाळ कांदा रोपे, खरीप पिकांना फटका

अचानक आलेल्या पावसामुळे सटाणा, देवळा परिसरात शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे रब्बी उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासह काढणीस आलेला बाजरी,सोयाबीन व मका हे पीक पावसात भिजल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे सोंगलेली पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली. पूर्वहंगामी द्राक्ष पिकांना हा पाऊस अपायकारक नाही. काही शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर टाकल्याने त्यांना अडचण येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT