Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : सिंधुदुर्गात किनारपट्टीवर मुसळधार पाऊस

Rain Alert : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम असून मंगळवारीदेखील (ता. ९) जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम असून मंगळवारीदेखील (ता. ९) जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे काही भागांतील पूरस्थिती कायम आहे.

काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढले असून येथील नागरिकांचे स्थंलातर करण्यात आले. तर पांग्रड येथील एका घरावर दरड कोसळली. ७२ कुटुंबातील ३७० नागरिकांचे स्थंलातर करण्यात आले. पुरामुळे शेकडो मालमत्तांचे आणि शेतीचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. किनारपट्टी वगळता उर्वरित जिल्ह्यात पावसाचा जोर किंचित ओसरला आहे.

जिल्ह्याला रविवारी (ता. ७) मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यानंतर सोमवारी सकाळपासूनच किनारपट्टी भागात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता. उर्वरित जिल्ह्यात जोर काहीसा कमी झाला. परंतु किनारपट्टीच्या मालवण, वेंगुर्ला आणि देवगड या तालुक्यात जोरदार पाऊस सुरूच आहे.

त्यामुळे येथील कर्ली नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. या पुराच्या वेढ्यांमध्ये काही गुरे अडकली. १५ ते २० पॉवर टीलर पुराच्या पाण्याखाली सापडले असून भातरोपेदेखील वाहून गेली. काळसे बागवाडीला प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.

वेंगुर्ले तालुक्यातदेखील जोरदार पाऊस सुरू असून या भागातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे. जिल्ह्यात पुरामुळे आतापर्यंत ५७ घरांचे नुकसान झाले आहे. एक म्हैस वाहून गेली असून एका पोल्ट्रीत पुराचे पाणी शिरल्यामुळे ३ हजार कोंबड्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ७१ कुटुंबातील ३७० नागरिकांचे आतापर्यंत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांच्या पातळीत घट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT