Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : नगर जिल्ह्यातील बारा मंडलांत जोरदार पाऊस

Nagar Rain News : नगर जिल्ह्यातील उत्तर भागात बऱ्यापैकी पाऊस असला तरी दक्षिण भागात अजूनही फारसा जोरदार पाऊस नसल्यामुळे उत्तर जिल्ह्याच्या तुलनेत पाणीसाठा व पाणी उपलब्धता कमी आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी (ता. १) झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या मूग, उडदाला मात्र फटका बसला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू असल्याचा भाजीपाला व पालेभाज्यालाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोवीस तासांत शेवगाव पाथर्डी तालुक्यातील १२ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे.

नगर जिल्ह्यातील उत्तर भागात बऱ्यापैकी पाऊस असला तरी दक्षिण भागात अजूनही फारसा जोरदार पाऊस नसल्यामुळे उत्तर जिल्ह्याच्या तुलनेत पाणीसाठा व पाणी उपलब्धता कमी आहे. दक्षिण भागातील गाव तलाव पाझर तलाव मध्यम प्रकल्पात कमी पाणीसाठा आहे. दोन दिवसांपासून दक्षिणेतील काही भागात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे.

रविवारी (ता.१) सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. शेवगाव तालुक्यातील शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी मानूर, कोरडगाव, करंजी, मिरी अशा बारा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी (ता.१) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नगर व पारनेर तालुक्यांत उडीद, मुगाची काढणी सुरू आहे.

दोन्ही मिळून जवळपास एक लाखापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड आहे. यंदा मूग, उडदाची स्थितीही चांगली आहे. मात्र ऐन काढणीच्या काळात पावसाने जोर धरल्यामुळे नुकसान होत आहे. अनेक भागात शेंगातच मूग, उडदाला कोंब फुटले आहे. काही भागात पिके वाया गेली आहेत.

नालेगाव ः १५, सावेडी ः २६, कापूरवाडी ः २३, केडगाव ः २५, भिंगार ः १५,नागापूर ः २७, जेऊर ः३७, चिचोंडी ः २९, वाळकी ः २३, चास ः २१, रुईछत्तीशी ः २९, जामखेड ः ४३, अरणगाव ः २४ खर्डा ः ५४, नान्नज ः ४३, नायगाव ः ४३, शेवगाव ः ९२, भातकुडगाव ः ७४, बोधेगाव ः ८३, चापडगाव ः १००, ढोरजळगाव ः ७४, एरंडगाव ः ५७, पाथर्डी ः ६६, माणिकदौडी ः ६६, टाकळी मानूर ः ८१, कोरडगाव ः ६९, करंजी ः ८१, मिरी ः ६५, नेवासा खुर्द, ः १६, नेवासा बुद्रुक ः ४०, सलाबतपूर ः ६२, कुकाणा ः ६०, चांदा ः १६, घोडेगाव ः १६, सोनई ः ४७, वडाळा ः १६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT