Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain Update : सिन्नर तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी

Latest Rain Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झालेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता. २९) रोजी सिन्नर, येवला तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी झाल्या.

Team Agrowon

Nashik News : अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झालेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता. २९) रोजी सिन्नर, येवला तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी झाल्या. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी झाल्या तर कसमादे भागात पावसाने विश्रांती दिली.

जिल्ह्यात गेल्या सप्ताहात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली असून, ८५ टक्के साठा झाला आहे. तर ग्रामीण भागातील अनेक साठवण तलाव भरल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली असली तरी रब्बी हंगामातील आशा वाढल्या आहेत.

जिल्ह्याच्या विविध भागांत दुपारी २ वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील गोंदे, दापुर भागांत पावसाचा जोर दिसून आला. तर येवला, निफाड, चांदवड तालुक्यात हलक्या ते माध्यम सरी झाल्या.

या भागात जवळपास ६० मिमी पाऊस झाल्याचे शेतकरी व हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी सांगितले. पावसाचा जोर अधिक असल्याने शेतात पाणी साचले होते. कसमादे भागातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात अनेक भागात कडक ऊन होते.

११ धरणांतून विसर्ग सुरू

आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, धारणा, भावली, मुकणे,वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर या ११ धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे. तर पाण्याची नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात आवक कायम असल्याने ७,६९७ क्युसेक विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT