Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : सांगली जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी

Rain Update : सांगली जिल्ह्यात शनिवारी (ता. १३) सायंकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात शनिवारी (ता. १३) सायंकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३७.७ मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिराळा तालुक्यात पाऊस झाला तर इतर भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावले.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. कधी ढगाळ तर कधी ऊन असे वातावरण होते. जिल्ह्यात शनिवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर जोरदार पाऊस पडला. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता.

शिराळा तालुक्यातील वारणा धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला होता. शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भात पिकाला हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. भात रोपांच्या लागवडीची तयारी शेतकरी करू लागला असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंतच्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे ः मिरज ५.९ (२५४.५), जत ०.१ (२४४), खानापूर-विटा १.९ (२२४.९), वाळवा-इस्लामपूर १५.६ (३१९.९), तासगाव ३.३ (२७७.३), शिराळा ३७.७ (४३६.७), आटपाडी ०.९ (२१६.७), कवठेमहांकाळ १.७ (२९५.३), पलूस ५.५ (२३२.९), कडेगाव ६.२ (२५८.६).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT