Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Rain Update : नगरच्या बहुतांश भागात दमदार पाऊस

Rain News : नगर जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पावसाने काहीशी दडी मारली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांना अडचण झाली होती.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात सोमवारी (ता.१५) दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. पन्नास महसूल मंडलांत दमदार पाऊस झालेला असून तीन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

नगर जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात पावसाने काहीशी दडी मारली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकांना अडचण झाली होती. दोन दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली.

सायंकाळी उशिरा अनेक भागांत जोरदार सुरुवात झाली. सोमवारच्या पावसाने नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा,संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आदी भागांतील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

कर्जत, केडगाव आणि वांबोरी या महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली असून सुमारे पन्नास महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातही रतनवाडी, पांजरे, घाटघर, भंडारदरा, वाकी आदी भागांत जोरदार पाऊस सुरू असून भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

मंगळवार (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः

नालेगाव ः ३४, सावेडी ः २६, कापूरवाडी ः ४३, केडगाव ः १०१, भिंगार ः ४० ,नागापूर ः ३७, जेऊर ः ३१, चिचोंडी ः ५८, वाळकी ः २७, चास ः ५२, रुईछत्तीशी ः ३०, भाळवणी ः ३३, सुपा ः ११, वाडेगव्हाण ः ३२, मांडवगण ः २५, बेलवंडी ः ३२, कोळगावः ५९, कर्जत ः १००, राशीन ः ३९, भांबोरा ः ४६, कोंभळी ः ३०, मिरजगाव ः २३, माही ः २२, जामखेड ः ३०, आरणगाव ः१९, खर्डा ः ४९, नान्नज ः ३०, नायगाव ः ३०, बोधेगाव ः २६, पाथर्डी ः ४३ माणिकदौंडी ः२३, करंजी ः ३९, मिरी ः ४९, चांदा ः ३२, घोडेगाव ः२९, राहुरी ः ३०, सात्रळ ः ३६, टाकळीमिया ः ३७, ब्राह्मणी ः २७, वांबोरी ः ६७, आश्वी ः २५, सिबलापुर ः २५, तळेगाव ः २२, घारगाव ः २६, डोळासणे ः २६, साकूर ः ४५, पिंपरणे ः २४, पोहेगाव ः २९, लोणी ः ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT