Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : मलकापूरमध्ये अतिवृष्टी

Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. मलकापूर, नांदुरा तालुक्यांत अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. बुलडाणा, खामगाव, चिखली या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात मागील चार दिवसांत बऱ्याच भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. प्रामुख्याने मलकापूर तालुक्यात मागील २४ तासांत अतिवृष्टी झाली असून, ११७ मिलिमीटर एवढी विक्रमी पावसाची यंदाची सर्वाधिक नोंद झाली आहे. त्यातही जांभूळधाबा मंडलात सुमारे १६६ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात प्रामुख्याने मलकापूर १०८, दाताळा ९७.५, नरवेल १०४.०, धरणगाव १०८.८ , जांभूळधाबा १६६ मिलिमीटर अशा पद्धतीने या मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मलकापूर तालुक्यात सरासरी ११७.२ मिलिमीटर पाऊस झाला. मोताळा तालुक्यातही धामणगाव बढे ३०, मोताळा ६४, बोराखेडी ७०, पिंपरी गवळी ५८.८, रोहिणखेड ६६, पिंपळगाव देवी १३.८, शेलापूर बुद्रुक ७२.५, नांदुरा मंडलात १९.५, शेंबा ९०.३, निमगाव ३२, चांदूरबिस्वा ९७.८ असा जोरदार पाऊस झाला.

रविवारी (ता.१३) जिल्ह्यात अनेक तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. काढणीला आलेले सोयाबीन कुठे उभे, तर कुठे सोंगणी करून जमिनीवर पडलेले आहे. नांदुरा तालुक्यात शेंबा, चांदूरबिस्वा मंडलांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वादळाने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. कपाशीची झाडे मोडून पडली.

या अतिवृष्टीनंतर नुकसान पाहणीसाठी मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे, महसूल, कृषी विभागाची यंत्रणा सकाळपासूनच ठिकठिकाणी भेट देत होते. अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार एकडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management: बंधाऱ्यांतील पाण्याने बहरणार उन्हाळी पिके

Forest Protection: सातपुड्यात डिंकासाठी वणवे पेटविण्याचे प्रकार

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची कापूस खरेदी कासव गतीने

Lumpy Skin Disease: संभाजीनगर, जालना, बीडमध्ये ५४५ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा

Agriculture University: शिर्के प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे कृषिशास्त्रज्ञांचे लक्ष

SCROLL FOR NEXT