Kolhapur Rain Forecast agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain Forecast : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान, दोन दिवस पावसाची शक्यता

Rain Crop Damage : दिवाळीनंतर पुढील चार दिवसांत पाऊस पुन्हा पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. ग्रामीण भागात अद्याप भाताची मळणी सुरू आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गुरूवारी (ता.१४) रात्री आकरा वाजता अचानक मुसळधार पाऊस झाला. करवीर, राधानगरी, भुदरगड, हातकणंगले तालुक्यात भात आणि भुईमूग काढणाऱ्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. वीटभट्टी व्यावसायिकांचे कच्चा माल भिजल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान शुक्रवार आणि शनिवार कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

करवीर तालुक्यातील बालिंगा, दोनवडे, वाकरे, कोपार्डे या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. तर हातकणंगले तालुक्यात १५ मिनीटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले दुथडी वाहू लागले. पावसाळ्यानंतर अद्याप शेती पंप जोडलेले नाहीत. माळरानावरील ऊस पिकांना पाण्याची गरज होती. या पावसामुळे अशा ऊस पिकांना दिलासा मिळाला.

दिवाळीनंतर पुढील चार दिवसांत पाऊस पुन्हा पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. ग्रामीण भागात अद्याप भाताची मळणी सुरू आहे. या पावसामुळे मळणीच्या कामातही व्यत्यय निर्माण झाला आहे.

विजेच्या कडकडाटासह पाऊस

आजरा तालुक्यात रात्री साडेनऊच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. राजकीय सभांवरही परिणाम झाला. पावसामुळे सुगीची कामेही ठप्प झाली आहेत. चित्रा नदीच्या परिसरात हत्तीवडे, बोलकेवाडी परिसरात वीज पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाटंगी परिसरातील गावे अंधारात

विजेच्या कडाक्याने शहरासह परिसरातील वीजपुरवठा सुमारे तासभर खंडित झाला होता. वाटंगी परिसरातील गावांना बसला आहे. येथील गावे अंधारात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT