Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Heavy Rain : कोल्हापुरात पावसाचा पेरणीच्या कामांत अडथळा

Sowing Delay : मध्यंतरीच्या पावसानंतर पाऊस थांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले आहे. तीन-चार दिवस शिवारात चांगले ऊन पडल्याने शेतीत वाफसाही येत होता. यामुळे तुमच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र लगबग वाढली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा शेती कामांमध्ये खोडा घातला आहे. दुपारी चार वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत जोरदार पाऊस झाल्याने रानात चिखल झाल्याचे चित्र होते.

जोरदार पावसामुळे सुरू असलेल्या पेरणी कामाला दणका बसला आहे. मध्यंतरीच्या पावसानंतर पाऊस थांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले आहे. तीन-चार दिवस शिवारात चांगले ऊन पडल्याने शेतीत वाफसाही येत होता.

यामुळे तुमच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र लगबग वाढली. शेती तयार करून पेरणीच्या कामात शेतकरी व्यस्त असताना झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा खोळंबा केला आहे.

पावसामुळे सुमारे १० हजार हेक्टर शेतावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबत शेतातील मातीही वाहून गेली. जिल्ह्यातील करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील ओढ्याकाठच्या जमिनीवरील पिकांना मोठा फटका बसला आहे.

राधानगरी धरणाच्या पॉवर हाऊस टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवून १५०० क्युसेक करण्यात आला. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुंभी मध्यम प्रकल्पाच्या विद्युत गृहामधून ३०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT