Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम

Heavy Rain in Marathwada: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर कायम होता.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचा जोर कायम होता. जालना जिल्ह्यातील दोन मंडले वगळता सर्वदूर हलका, मध्यम तर काही मंडलांत दमदार ते जोरदार पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ८३ मंडलांत हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४७ मंडळात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जालना जिल्ह्यात सरासरी १७.७ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील सर्व ७६ मंडळात पावसाची तुरळक, हलकी, मध्यम तर काही मंडलांत दमदार हजेरी लागली. जिल्ह्यात सरासरी १२.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेडमध्ये सरासरी ६.५ मिलिमीटर, परभणीत सरासरी १७.३ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सतत होत असलेला हा पाऊस काढणीला आलेल्या सोयाबीन साठी धोक्याची घंटा ठरला असून कपाशीचेही नुकसान करतो आहे.

मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीगर २६.३, उस्मानपुरा ४६.३, भावसिंगपुरा १४, कांचनवाडी ३६.८, चिकलठाणा ११.५, चित्तेपिंपळगाव २१, करमाड १५.३, लाडसावंगी १३, हर्सूल १३.५, कचनेर २२.५, पंढरपूर १७.८, शेकटा ४१.३, आडूळ १८.३, बालानगर १५.५, लोहगाव ११.८, पाचोड ११.५, मांजरी १३.५, भेंडाळा ३२.८, तुर्काबाद २८.३, वाळूज ३५, हर्सूल १३, डोणगाव १२.५, सिद्धनाथ वडगाव १५.३, गाजगाव १५.३, जामगाव १९, लासूरगाव १०, कन्नड १०, चापानेर १०, निल्लोड १०, गोळेगाव १०.८, अजिंठा ४९.५, शिवना १६.५, सोयगाव १०.३, सावलदबारा २६.८, जरांडी १२.३, फूलंब्री २८.३, पिरबावडा २१.८, वडोदबाजार १९.५.

जालना जिल्हा

जालना शहर २१.८, जालना ग्रामीण १२.५, वाघृळ २८.५, नेर १२.५, शेवली ११.८, अंबड १७.५, धनगरपिंपरी ४५, जामखेड ६०.३ , रोहिलागड ६०.३, गोंदी १८, वडिगोद्री १८.८,परतूर १५.५, दाभाडी १०.५, बावणे पांगरी १८.५, तीर्थपुरी ११.५, कुंभारपिंपळगाव ११, जांब समर्थ ३६.३, पांगरी गोसावी १२.५.

बीड जिल्हा

बीड २३.८, पाली ४२.५, राजूर नवगण १२.५, पिंपळनेर १८.५, पेंडगाव ३७.५, मांजरसुंभा १२.८, चौसाळा ३२.५, थेरला १३.५, आष्टी ३९.३, टाकळसिंग ३९.५, गेवराई ३९, मादळमोही १५.५, जातेगाव १५, सिरसदेवी ३१.८, रेवती ३१.३, तलवाडा २३.५, माजलगाव १०.३ , किट्‌टी अडगाव १८.३, तालखेड १२, नित्रूड १५.३, दिंद्रूड १०.८, घाटनांदूर १३.५, बर्दापूर १०.५, परळी १२, धर्मापुरी १३.३, नागापूर १२, पिंपळगाव गाढे १४.

चार मंडलांत अतिवृष्टी

मराठवाड्यातील जालना धाराशिव व लातूर या तीन जिल्ह्यातील चार मंडळात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी मंडळात ७८.२५ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील मुरुड मंडळात १०९.२५ मिलिमीटर, धाराशिव जिल्ह्यातील ईटकुर मंडळात १०५.५० मिलिमीटर तर धाराशिव जिल्ह्यातीलच गोविंदपूर मंडळात ६८.२५ मिलिमीटर इतकी अतिवृष्टीची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

Crop Loss: कापणीच्या मुहूर्तावर अस्मानी संकट

Jayakwadi Dam: जायकवाडीतून गोदापात्रातील विसर्गात घट 

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT