Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Damage: खानदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी

Unseasonal Rain: खानदेशात मागील आठवड्यात तीन दिवस विविध भागांत वादळी पाऊस, गारपीट झाली. यात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात मागील आठवड्यात तीन दिवस विविध भागांत वादळी पाऊस, गारपीट झाली. यात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. महसूल प्रशासन पंचनामे करीत असून, जळगाव जिल्ह्यात सुमारे ३०० हेक्टरवरील केळी बागांची हानी झाल्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. ११), शनिवारी (ता. १२) व रविवारीदेखील (ता. १३) खानदेशात वादळी पाऊस झाला आहे. यात केळीची हानी चोपडा, जळगाव, रावेर, यावल आदी तालुक्यांत झाली असून, सुमारे ३०० हेक्टरला मोठा फटका बसला आहे. तसेच अन्य भागांतही नुकसान झाले आहे. सुमारे १०० पेक्षा अधिक केळी उत्पादकांचे यात नुकसान झाले आहे. रावेरमधील नुकसान पातळी कमी आहे.

यावलमध्येही नुकसान कमी आहे. पण चोपडा तालुक्यात अधिकची हानी झाली. जळगावातील भोकर, भादली खुर्द, पिलखेडा, गाढोदे, फुपनगरी, फुपणी आदी भागांत केळीसह अन्य पिकांची मोठी हानी झाली आहे. यात केळीला वादळाचा अधिकचा फटका बसला आहे. सलग तीन दिवस वादळी पाऊस आल्याने लहान केळीबागांची पाने फाटून नुकसान पातळी ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या बागा किंवा काढणीवरील बागा भुईसपाट झाल्या आहेत.

दुसरीकडे उष्णताही अधिक आहे. रोज ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान आहे. या स्थितीत महसूल प्रशासन पंचनामे करीत आहे. विमा कंपनीनेदेखील संबंधित भागात पंचनामे तत्काळ उरकून भरपाईसंबंधी पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. वादळी पाऊस झाला, पण महसूल प्रशासन, कृषी सहायक अनेक भागांत पोहोचलेलेच नसल्याच्या तक्रारीदेखील आहेत.

महसूल प्रशासन नुकसनीची टक्केवारी कमी आहे, आम्हाला आदेश नाहीत, असे सांगून ढकलाढकली करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, प्रशासनातील वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. धुळे व नंदुरबारमध्येही सुमारे १०० हेक्टरवरी केळीबागांसह अन्य पिकांना फटका बसला आहे. काही भागात अंशतः हानी झाली आहे.

मंत्र्यांची पाहणीच नाही

जळगाव जिल्ह्यात राज्य शासनातील दोन मंत्री आहेत. परंतु नुकसानीबाबत कुठेही पाहणी कुणीही केली नाही. केळी पीकहानीची पाहणी करण्यासह शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची गरज आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून पुढील कार्यवाही करावी, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT