Nanded Crop Damage: वादळी वाऱ्यासह अवकाळीचा केळी, पपई बागांना फटका

Unseasonal Rain Crop Damage: नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने धडक दिली. केळी, पपई, आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Banana Crop Damage
Banana Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nanded News: नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात गुरुवारी (ता. १०) पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे डोंगरगाव, आंबेगाव, शेंबोली, पांढरवाडी, चितगिरी, बारड, निवघा परिसरांतील केळी, पपई या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी मुखेडसह जिल्ह्याच्या अनेक भागांत झालेल्या अवकाळी पावसानंतर गुरुवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. हा पाऊस मुदखेड तालुक्यात सर्वाधिक झाला. गुरुवारी दुपारी चारनंतर वारा सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसाने झोडपून काढले.

Banana Crop Damage
Unseasonal Rain: मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

या काळात मुदखेड तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी, या भागातील केळी, पपई, आंबा या फळपिकांसह चारा पिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा फटका मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव, आंबेगाव, शेंबोली, पांढरवाडी, चितगिरी, बारड, निवघा या गावांना बसला. याच भागात सध्या हळद शिजवणीचे काम सुरू आहे. परंतु अवकाळी पावसामुळे हे काम बंद पडले आहे.

Banana Crop Damage
Unseasonal Rain Crop Damage : वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांना फटका

वादळी वाऱ्याचा फटका आंबेगाव शिवारातील संदीप मुसळे यांच्या पपई बागेला बसला. वाऱ्यामुळे पूर्ण पपई बाग आडवी होऊन शेतात फळांचा सडा पडला. तर चितगिरी येथील कैलास सदाशिव गिरी यांची केळी बाग आडवी पडून मोठे नुकसान झाले आहे. काही भागात आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानीबाबत पाहणी करून प्राथमिक अहवाल आल्यावर आकडेवारी सांगता येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारीही ढगाळ वातावरण आहे. उन्हाचा पारा चाळिशीपार गेल्यामुळे उन्हाचे चटकेही बसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com