Weekly Weather Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Weekly Weather Update : अल्पशा पावसाची शक्यता

Weekly weather forecast : कोकण, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल.

 डॉ. रामचंद्र साबळे 

-डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रावर आज (ता. २) १००४ हेप्टापास्कल इतका तर उद्यापासून बुधवारपर्यंत (ता.३ पासून ५ पर्यंत) १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. गुरुवार (ता. ६) पासून पुढे शनिवार (ता. ८)पर्यंत पुन्हा हवेचे दाब कमी होतील. तेव्हा महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. जेव्हा हवेचे दाब कमी होतात, त्या वेळी मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन पावसाची शक्यता निर्माण होते. कोकण, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. कमाल तापमानात घसरण होऊन ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत किंवा त्याहून कमी राहील. सकाळच्या सापेक्ष आद्रतेत वाढ होईल. त्यामुळे सकाळी हवामान थंड राहील. उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याचा ताशी वेग २० ते २८ कि.मी. राहील.

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणतील. मॉन्सूनने बंगालच्या उपसागराचा व श्रीलंकेचा पूर्ण भाग व्यापलेला आहे. आगामी काळात मॉन्सून वारे केरळमध्ये दाखल होऊन तेथे चांगल्या पावसाला सुरुवात होईल. तसेच वारे दक्षिण कोकणच्या दिशेने पुढे सरकतील आणि ५ जूनपूर्वी दक्षिण कोकणातही चांगल्या पावसाची शक्यता राहील.

प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान इक्वॅडोरजवळ २६ अंश सेल्सिअस, तर पेरूजवळ १८ अंश सेल्सिअस झाले आहे. त्या ठिकाणी हवेचे दाब वाढल्याने वाऱ्यांचा प्रभाव हिंदी महासागराच्या दिशेने सुरू होईल. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्मिती होईल. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या तापमानही ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने मॉन्सूनला गती प्राप्त होईल.

कोकण :

या आठवड्याच्या सुरुवातीस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. बुधवार (ता. ५)पासून पुढे मॉन्सूनची चांगली प्रगती होईल. मॉन्सून या आठवडा अखेरीस महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापेल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १४ कि.मी. राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १४ कि.मी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ६२ टक्के, तर नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ७० ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते २४ टक्के इतकी कमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन वारे ताशी २० ते २८ कि.मी. इतक्या वेगाने वाहतील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा :

आज आणि उद्या (ता.२,३) धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ०.३ ते ०.५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व नांदेड जिल्ह्यांत १४ ते १५ कि.मी. तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ताशी १७ कि.मी. राहील. वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव व बीड जिल्ह्यांत ताशी १९ कि.मी. राहील. तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २० ते २१ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर नांदेड व जालना जिल्ह्यांत ते ३९ अंश सेल्सिअस राहील. मात्र परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व लातूर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते २३ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ :

कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ :

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ०.४ ते १.६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १६ टक्के राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता २५ ते ३६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. आज आणि उद्या (ता.२,३) सर्वच जिल्ह्यांत ०.६ ते २.३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच त्यापुढील काळातही पावसाची शक्यता राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

आज आणि उद्या (ता.२,३) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली व नगर जिल्ह्यांत ताशी २० ते २१ कि.मी., तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ताशी १६ ते १९ कि.मी. राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा व पुणे जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५५ ते ६८ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ७३ ते ८९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५१ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत १६ ते २१ टक्के राहील.

कृषी सल्ला :

- मातीची धूप होऊ नये म्हणून बांधबंदिस्तीची कामे करावीत. तसेच गरजेनुसार जमीन सपाट करावी.

- पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लाळ्या खुरकूत, फऱ्या व घटसर्प आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

- हुमणीचे भुंगेरे बाभूळ, कडुलिंब व बोर या झाडांवर रात्री बसतात. त्या वेळी झाडाच्या फांद्या हालवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करून त्यांचा नायनाट करावा.

- पूर्वमशागतीची कामे पूर्ण करून शेत पेरणीसाठी तयार ठेवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT